Kim Jong : इराण-इस्त्राइल युद्धावेळी किम जोंग यांचा धमाका, थेट बॅलिस्टिक मिसाइल सोडली, शेजारच्या देशात हायअलर्ट

North Korea missile test today :उत्तर कोरियाने संशयित बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण केल्यानंतर जपानने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. क्षेपणास्त्रे जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर समुद्रात पडल्याचे सांगितले जात आहे.
North Korea Kim Jong Un
North Korea Kim Jong UnSaam
Published On

North Korea Missile Launch Update : इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यामध्ये मागील १५ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाच्या झळा जगभरात बसत असतानाच किम जोंग उन यांच्या उत्तर कोरियाकडून मोठी लष्करी हालचाल करण्यात आली आहे. उत्तर कोरियाने शनिवारी संशयास्पद बॅलिस्टिक प्रक्षेपणास्त्र डागले. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाकडून नव्या बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी घेण्यात आली. किम जोंग यांच्या या निर्णयामुळे जपानमध्ये 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. (North Korea ballistic missile launch latest news)

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी नुकतीच एका नवीन युद्धनौकेतून क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी पाहिली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हे प्रक्षेपण करण्यात आले आहे. एकीकडे इराण-इस्रायल यांच्यात तणाव वाढलेला असतानाच किम जोंग यांनी घेतलेली ही चाचणी चिंतेचा विषय असल्याचे जपानकडून सांगितले जात आहे. जपानच्या तटरक्षक दलाने या घटनेची नोंद केली असून, 'एक संशयित बॅलिस्टिक प्रक्षेपणास्त्र समुद्रात पडले आहे,' असे स्पष्ट केले. जपानचे सार्वजनिक प्रसारक 'NHK' ने संरक्षण मंत्रालयाच्या एका अज्ञात अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, हे प्रक्षेपणास्त्र देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या (EEZ) बाहेर समुद्रात पडले. या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

North Korea Kim Jong Un
पालघरमध्ये भयंकर अपघात, पोलिसांच्या भीतीने पळाले अन् मालगाडीने चिरडले, ३ जणांचा जागेवरच मृत्यू

जपानच्या पंतप्रधान साने ताकाची यांच्या प्रशासनाकडून 'अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मिसाईलच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी तात्काळ आपत्कालीन प्रोटोकॉल सक्रिय करण्यात आले आहेत. उत्तर कोरियाने केलेल्या या नवीनतम मिसाईल चाचणीमुळे या भागातील सुरक्षेची चिंता आणखी वाढल्याचे वृत्त 'NHK' ने शनिवारी दिले. जपान कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १:३० वाजता उत्तर कोरियाकडून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले.

North Korea Kim Jong Un
Gas Shortage: गॅस सिलिंडरसाठी राज्य सरकारची नवी नियमाली; फडणवीस सरकारनं नेमका काय घेतला निर्णय?

दरम्यान, अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ९ मार्च ते १९ मार्च दरम्यान सुरू राहणार आहे. उत्तर कोरियाने या सरावांना प्रदीर्घ काळ विरोध केला आहे. "हा सराव म्हणजे उत्तर कोरियाविरोधात युद्धाची तयारी आहे," असा दावा किम जोंग सरकारने केला होता. प्योंगयांगने अलिकडेच अमेरिकेने त्यांना 'अणुशक्ती' म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी केली होती.

North Korea Kim Jong Un
Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा घसरले, प्रति तोळा इतकी किंमत; वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com