LPG shortage : देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा, खासदारांना संसदेत चहा-कॉफीही मिळेना, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Congress MP Mohammad Jawed on gas cylinder crisis : देशातील एलपीजी टंचाईचा फटका संसदेलाही बसल्याचा दावा काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी केला आहे. खासदारांना चहा-कॉफीही वेळेवर मिळाली नाही, तसेच गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Congress MP Mohammad Jawed
Congress MP Mohammad JawedSaam TV Marathi
Published On

LPG shortage in India affects Parliament canteen : इराण-इस्रायल युद्धाच्या वणव्याची झळ भारताला मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून लहान-मोठ्या शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. एका गॅस सिलिंडरसाठी लोकांच्या रांगा लागल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. एलपीजी टंचाईचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच नाही, तर खासदारांनाही बसत असल्याचे समोर आले आहे. संसदेत खासदारांना चहा-कॉफी वेळेवर मिळत नसल्याचे काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी सांगितले. त्यांनी 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत देशातील इंधन तुटवड्यावर परखड मत व्यक्त केले. इंधन टंचाईचे परिणाम आणि काळाबाजार यावर बोट ठेवत, त्यांनी केंद्र सरकारच्या दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा नसल्याचा केंद्र सरकारचा दावा काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी खोडून काढत खरी परिस्थिती वेगळी असल्याचे मत व्यक्त केले. संसदेत खासदारांना चहा-कॉफीही मिळत नसल्याचा दावा त्यांनी एएनआयशी बोलताना केलाय. गॅस सिलिंडरच्या वितरणात काळा बाजार होत असल्याचे सांगताना एलपीजीचे दर २ हजारांपर्यंत झाल्याचे त्यांनी सांगितले. गॅस सिलिंडरच्या तुटवड्याविरोधात सरकारने उचललेल्या पावलावर जावेद यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.

Congress MP Mohammad Jawed
Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा घसरले, प्रति तोळा इतकी किंमत; वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट

देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे यात शंका नाही. मी रोजा पाळत आहे, पण शुक्रवारी ​​संसदेत सिलिंडरवर चर्चा सुरू होती. खासदारांनी संसदेच्या कॅन्टीनमध्ये चहा-कॉफी मागितली, पण त्यांना मिळाली नाही. चहा-कॉफी उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. पण तरीही तुम्ही (केंद्र सरकार) घाबरण्याचे कारण नसल्याचा दावा करत आहात. देशात गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. गॅस सिलिंडरचा काळाबाजर होत आहे, सर्वसामान्यांना एका गॅससाठी १,५०० ते २००० रूपये मोजावे लागतात, असा दावा करत खासदार जावेद यांनी मोदी सरकारच्या परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Congress MP Mohammad Jawed
Kim Jong : इराण-इस्त्राइल युद्धावेळी किम जोंग यांचा धमाका, थेट बॅलिस्टिक मिसाइल सोडली, शेजारच्या देशात हायअलर्ट

देशातील एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यांवर विरोधकांनी लोकसभेत निषेध नोंदवला अन् जोरदार घोषणाबाजी केली होती. विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यावर उत्तर देताना अर्थमंत्री निर्माला सितारमण यांनी हल्लाबोल केला. देशाच्या हितासाठी सरकारसोबत उभे राहण्याऐवजी विरोधक बेजबाबदार भूमिका घेत आहेत, असा टीकेचा बाण त्यांनी सोडला होता. सीतारमण म्हणाल्या की,'पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे पुरवठा वितरणात व्यत्यय आलाय. एलपीजीशी संबंधित अडचणींना तोंड देण्यासाठी सरकार तयार आहे. पण विरोधक काहीही ऐकण्यास तयार नाहीत, हे विडंबनात्मक आहे.'

Congress MP Mohammad Jawed
Education Scam : शिक्षण विभागातील सर्वात मोठा घोटाळा, सरकारलाच १५० कोटींचा गंडा, अशी झाली पोलखोल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com