होर्मुझसाठी ट्रम्प इराणला बेचिराख करणार?अमेरिकेचा इराणला 48 तासांचा अल्टीमेटम

Hormuz Strait Crisis: होर्मुझसाठी ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिलाय... पुढच्या 48 तासात अमेरिका-इराणमधील संघर्ष नेमका कसा वाढणार आहे... आणि ट्रम्प इराणला बेचिराख करण्यासाठी काय रणनीती आखतायत... इराणनं युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेपुढे काय अटी ठेवलेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Rising tensions in the Middle East as Trump warns Iran of military action over the Strait of Hormuz crisis.
Rising tensions in the Middle East as Trump warns Iran of military action over the Strait of Hormuz crisis.Saam Tv
Published On

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी मित्रदेशांकडे अमेरिकेने भीक मागितली. मात्र, इराणने तब्बल 4 हजार किलोमीटर अंतरावर अमेरिकेच्या दिएगो गार्सिया या लष्करी तळ असलेल्या बेटावर मिसाईल डागले. आणि अमेरिकेला धडकी भरली. त्यानंतर चवताळलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बेचिराख करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिलाय.होर्मुझ जलमार्ग खुला केला नाहीतर थेट इराणच्या उर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकीच ट्रम्प यांनी दिलीय. इराणमधील कोणते पॉवर प्लांट्स अमेरिकेच्या टार्गेटवर आलेत ते पाहूयात..

इराणची बुशेहर, नतान्झ, फोर्डो आणि इस्फाहान ही प्रमुख अणुऊर्जा प्रकल्प अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत.

तेहरानजवळील 2,868 मेगावॅट क्षमतेचा दमावंद कम्बाईन्ड सायकल पॉवर प्लांट हा इराणमधील सर्वात मोठ्या औष्णिक वीज प्रकल्पांपैकी एक आहे.

आग्नेय इराणमध्ये असलेला केरमान कम्बाईन्ड सायकल पॉवर प्लांट 1,912 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आहे.

रामिन वाफेवर चालणारा वीज प्रकल्प खुझेस्तान प्रांतात असून याची क्षमता 1,890 मेगावॅट इतकी आहे.

नेका पॉवर हा माझंदरान प्रांतातील 1,760 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आहे.

1,600 मेगावॅट क्षमतेचा इस्फाहानमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्प

खरंतर, अमेरिकेनं धमकी दिली असली तरी इराणही काही कच्च्या गुरूचा चेला नाही. आमच्या वीज वितरण प्रणालीवर कोणताही हल्ला झाला तर या प्रदेशातील इस्त्रायल आणि अमेरिकन ऊर्जा संसाधनांना आम्ही टार्गेट करू, असं प्रत्युत्तर देतानाच इराणनं हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर आता 6 अटी ठेवल्यात.

युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या 6 अटी

1. तात्पुरता युद्धविराम न करता पुन्हा युद्ध करणार नाही याची हमी द्या.

2. आखाती देशांतून लष्करी तळ हटवा

3. युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या.

4. अमेरिकेनं सर्व प्रादेशिक युद्ध संपवावेत

5. होर्मुझ सामुद्रधुनीसाठी नवीन कायदेशीर व्यवस्था आणि जागतिक ऊर्जा मार्गावर इराणचा प्रभाव सुनिश्चित करणे.

6. इराणविरोधी प्रचार करणाऱ्या माध्यमांतील संबंधित व्यक्तींवर कारवाई व प्रत्यर्पण तात्काळ थांबावेत.

खरंतर, इराण आणि इस्त्रायल-अमेरिका यांच्यातील युध्द थांबवण्यासाठी दोन्ही बाजूनं दबाव टाकला जातोय. असं जरी असलं तरी खामेनींच्या मृत्यूनं इरेला पेटलेल्या इराणनं अमेरिकेला गुडघ्यावर आणण्याची रणनीती आखलीय. त्यामुळे अमेरिका माघार घेणार की हल्ले तीव्र करून युद्ध आणखी भडकणार याकडे जगाचं लक्ष्य लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com