Blackout Siren Difference: रेड आणि ग्रीन अलर्ट, सायरनमधील फरक कसा ओळखावा, वाचा आणि समजून घ्या!

Chandigarh Administration Advised Siren Meaning: संभाव्य हवाई हल्ला होण्याआधी भारतातील ठिकठिकाणी ब्लॅकआऊटसह सायरन वाजवले जात आहे. या सायरनच्या आवाजाचा अर्थ समजण्यासाठी चंडीगड जिल्हा प्रशासनाने सायरनच्या आवाजामधील फरक कसा ओळखावा याबाबतची माहिती दिली आहे.
Siren Meaning.
Siren Meaning.saam Tv
Published On

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य स्थितीमुळे दिवसेंदिवस तणाव वाढत चालला आहे. पाकिस्तानकडून भारताच्या पंजाब, राजस्थान आणि गुजरातसारख्या राज्यांतील काही भागांत ड्रोन हल्ला करण्यात येत आहे. भारतीय सैन्य दलाकडून याला चोख प्रत्युत्यर देण्यात येत आहे. याच अनुषंगाने ठिकठिकाणी ब्लकआऊट करण्यात येत आहे. पाकिस्तानने काल चंदीगडवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय हवाई दलाने हे सर्व ड्रोन पाडले.

हवाई हल्ला होण्याआधी अनेक ठिकाणी सायरन वाजवण्यात आले. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. असाच एक प्रकार काल महाराष्ट्रातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिसरात आणि छत्रपती शिवाजी महाराज परिसरात घडला. दुपारी अचानक सायरन वाजल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक सायरन वाजल्याने लोक आहे त्या अवस्थेतच पळत सुटले.

सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर चंदीगड जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण सूचना जारी केली आहे. प्लबिक वॉर्निंग म्हणजेच सार्वजनिक सतर्कतेचा इशारा देणाऱ्या सायरनचा अर्थ समजण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. हे सायरन संभाव्य हवाई हल्ल्याच्यावेळी वाजवले जातील. हे सायरन आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सावध करण्यासाठी असतात. हा स्टॅंडर्ड सिव्हिल प्रोटोकोलचा भाग आहे.

सायरनमधील फरक कसे ओळखावे?

चंडीगड जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सायरनच्या आवाजामधील फरक सांगण्यात आला आहे. तसेच सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावे आणि काय करु नये याबाबतच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. आपात्कालीन स्थितीमध्ये दोन प्रकारचे सायरन वाजवले जाऊ शकतात. एक म्हणजेच रेड अलर्ट आणि दुसरा म्हणजे ग्रीन अलर्ट. यामधला फरक कोणता जाणून घेऊयात.

रेड अलर्ट

पहिला सायरन म्हणजे रेड अलर्ट, जो हवाई हल्ल्याच्या होण्याआधी सतर्कतेचा संकेत देतो. या सायरनमध्ये वर-खाली आवाज येतो. ४ सेकंद वर आणि ४ सेकंद खाली.आणि तो सलग पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाजतो. जेव्हा या सायरनचा आवाज ऐकू येतो तेव्हा लोकांनी घरातच राहावे. सर्व लाइट्स किंवा दिवे बंद करावेत आणि सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अशावेळी कोणत्या परिस्थितीत घराच्या बाहेर पडू नये.

Siren Meaning.
Viral Video : हीच खरी देशभक्ती! डीसींचे एक आवाहन अन् अनेक तरूणांनी धरली भरतीची वाट, म्हणाले- सैन्याला पाठिंबा देण्यासाठी...

ग्रीन अलर्ट

दुसरा सारयन म्हणजे ग्रीन अलर्ट. जो हवाई हल्ल्याचा धोका दूर झाल्यावर किंवा टळल्यावर वाजवला जातो. या सायरनचा आवाज स्थिर असतो. हा सायरन किमान एक मिनिटासाठी वाजतो. हा सायरन तात्काळ धोका टळल्याचे संकेत देतो. यानंतर लोक नियमित कार्य करू शकतात. परंतु अशावेळी नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे आणि आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवले पाहिजे.

चंडीगड जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रशासनाकडून शेअर केलेला संपूर्ण व्हिडिओ पाहण्याचे आवाहन केले आहे. तसेच भीती आणि गोंधळ टाळण्यासाठी हा व्हिडिओ संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवण्याचे आवाहन केले आहे.

Siren Meaning.
India-Pakistan: आम्ही माघार घ्यायला तयार, भारताच्या उत्तरानं थरथरणारा पाकिस्तान आता करतोय गयावया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com