राज्यातील प्रमुख शहरांमध्ये होणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा पंचायत निवडणुकांपूर्वी गुजरात सरकारने पोलिस विभागात मोठे फेरबदल केले आहेत. राज्य सरकारने ३७ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत आणि त्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. याबदलीमध्ये गुजरात केडरमधील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. शमशेर सिंग यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नागरी संरक्षणासह होमगार्ड प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला बीएसएफमधून (BSF) शमशेर सिंग गुजरातला आले होते.
आयपीएस बदल्यांमध्ये, सरकारने २०१० बॅचचे आयपीएस अधिकारी निर्लिप्त राय यांच्याकडे राजकोट रेंजची जबाबदारी सोपवली आहे. राजकोटमधील त्यांची नियुक्ती गोंडलमधील राजकीय घडामोडीशी जोडली जात आहे. निर्लिप्त राय हे गुजरातमधील सर्वात कडक आणि शिस्तीचे अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. ते सध्या स्टेट मॉनिटरिंग सेल (एसएमसी) चे प्रभारी होते.
गुजरात सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये २००७ बॅचच्या आयपीएस अधिकारी परिक्षिता राठोड यांना मोठी जबाबदारी दिली आहे . आयजी(IG) सीआयडी(CID) क्राइमची जबाबदारी सांभाळणाऱ्या परिक्षिता राठोड यांना आता बनासकांठा विभागाच्या आयजी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २००९ बॅचच्या आयपीएस अधिकारी विधी चौधरी यांना अहमदाबाद शहराच्या अतिरिक्त आयुक्त (विशेष शाखा) वरून पंचमहल-गोधरा विभागाच्या डीआयजी करण्यात आले आहे. त्या आता या विभागाचा कारभार बघतील. गुजरातच्या वडोदरा शहरात अतिरिक्त आयुक्त (गुन्हे आणि कायदा आणि सुव्यवस्था) पद सांभाळणाऱ्या डॉ. लीना पाटील यांची पोलिस अकादमीमध्ये बदली करण्यात आली आहे. लीना पाटील या २०१० बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.
परीक्षिता राठोड, आयजी बनासकांठा विभाग
राघवेंद्र वत्स, आयजी अहमदाबाद विभाग
आर.व्ही. अन्सारी, आयजी भावनगर विभाग
मयूर पाटील, डीसीपी झोन-८ अहमदाबाद
डॉ. करण राज वाघेला, अतिरिक्त सीपी, गुन्हे सुरत
पी एल माल, अतिरिक्त संचालक, एसीबी गुजरात
मकरंद चौहान, डीआयजी कायदा व सुव्यवस्था
सरकारने राजकोट रेंजमधील २००३ बॅचचे आयपीएस अधिकारी अशोक कुमार यांची गांधीनगर येथे आयजी सीआयडी (गुप्तचर) या पदावर बदली केली आहे. २००४ बॅचचे आयपीएस अधिकारी गगनदीप गंभीर यांची आयजी पदावरून गुजरातमधील स्टेट मॉनिटरिंग सेल (एसएमसी) येथे बदली करण्यात आली आहे . या पदावर पूर्वी निर्लिप्त राय होते. गगनदीप गंभीर हे अत्यंत गतिमान अधिकारी आहेत. २००६ बॅचचे आयपीएस अधिकारी आणि जुनागढ विभागाचे पूर्वी आयजी निलेश जाजडिया यांची वडोदरा येथे बदली करण्यात आली आहे. त्यांना वडोदरा येथे संयुक्त आयुक्त (सेक्टर २, गुन्हे, कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. २०१० बॅचचे आयपीएस अधिकारी दीपक मेघानी यांना महत्त्वपूर्ण भूमिका देण्यात आली आहे. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) सहसंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ते पूर्वी डीआयजी (कायदा आणि सुव्यवस्था) होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.