होळीचे रंग आणि गुलाल बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग; पाच महिलांचा मृत्यू, अनेक कामगार जखमी

Haryana Safidon Holi Color Factory Fire Incident: हरियाणातील जिंद जिल्ह्यातील सफीदोन येथे होळीचे रंग आणि गुलाल बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागून पाच महिला कामगारांचा मृत्यू झाला तर २० कामगार गंभीर जखमी झाले.
Firefighters and locals attempt rescue after a massive blaze broke out at a Holi color and gulal manufacturing factory in Safidon, Haryana, leaving five women workers dead and several injured
Firefighters and locals attempt rescue after a massive blaze broke out at a Holi color and gulal manufacturing factory in Safidon, Haryana, leaving five women workers dead and several injuredSaam Tv
Published On

हरियाणा राज्यातील जिंद येथील शनिवारी दुपारी सफीदोन येथे होळीचे रंग आणि गुलाल बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. या भीषण अपघातात आतापर्यंत पाच महिलांचा मृत्यू झाला आहे, तर २० कामगार गंभीररित्या भाजले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पानिपत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढू शकतो. आतापर्यंत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र अपघाताचा तपास अद्याप सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून काही तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.

Firefighters and locals attempt rescue after a massive blaze broke out at a Holi color and gulal manufacturing factory in Safidon, Haryana, leaving five women workers dead and several injured
संजय यांच्या घरी बैठकींचा धडाका; आमदार-खासदारांची गर्दी, राज्याला नवा मुख्यमंत्री, राजकारणात खळबळ

सॅफिदोनच्या भट कॉलनीमध्ये होळीचे रंग आणि गुलाल बनवणारा एक कारखाना आहे. या कंपनीत नेहमीप्रमाणे ३० कामगार काम करत होते. अचानक आग लागली आणि काही मिनिटांतच संपूर्ण परिसरात पसरली. धूर आणि आग सर्वत्र पसरू लागली आणि कामगार जोरजोरात ओरडायला लागली. त्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. धुराचे लोट पाहून जवळच्या लोकांनी तात्काळ आग विझवण्याचे प्रयत्न केले आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. कारखान्याचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद असल्याचा आरोप कामगारांनी केला. यामुळे ते बाहेर पडू शकले नाहीत आणि आगीमध्ये अडकले.

Firefighters and locals attempt rescue after a massive blaze broke out at a Holi color and gulal manufacturing factory in Safidon, Haryana, leaving five women workers dead and several injured
Shocking : बॉयफ्रेंडच निघाला हैवान; उसाच्या शेतात नेत ८ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, अत्याचारानंतर पीडितेसोबत केलं भयंकर

स्थानिकांनी हा दरवाजा तोडला, त्यानंतर काही कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. दोन महिला कामगार भाजल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच जखमींना उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यामध्ये अनेक लोकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पानिपत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी आणखी तीन महिलांचा मृत्यू झाला.

Firefighters and locals attempt rescue after a massive blaze broke out at a Holi color and gulal manufacturing factory in Safidon, Haryana, leaving five women workers dead and several injured
Vladimir Putin : अमेरिकाविरोधात रशियाचा इराणला जाहीर पाठिंबा, व्लादिमीर पुतीन म्हणाले...

या सर्व घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृतांच्या नातवाईकांनी रस्ता अडवण्याची धमकी दिली. मात्र पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नतेवाईकांनी माघार घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com