

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलवर गेलेल्या तरुणाचा मृत्यू
शक्तीवर्धक गोळ्यां खाणं तरुणाला महागात पडलं
शरीरसंबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू झाला
गर्लफ्रेंडसोबत शरीरसंबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना छत्तीसगडच्या जांजगीर जिल्ह्यात घडली. तरुण गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलवर गेला होता. त्याठिकाणी शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी तरुणाने शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या होत्या. या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुण जावलपुर येथे राहत होता. मृत्यू झालेल्या तरुणाची इन्स्टाग्रामवर एका तरुणीसोबत ओळख झाली होती. दोघे फोनवर नेहमी बोलताचे. इन्स्टाग्रामवरील मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. दोघेजण नेहमी भेटायचे. तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेला होता. तो तिला घेऊन हॉटेलवर गेला होता. त्याठिकाणी शरीरसंबंध ठेवताना अचानक त्याचा मृत्यू झाला आणि एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
डॉक्टरांना तरुणाच्या पँटमध्ये काही गोळ्या सापडल्या. या शक्तीवर्धक गोळ्या होत्या. या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे शरीरसंबंध ठेवताना तरुणाची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे छत्तीसगडमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिस तरुणीची चौकशी करत आहेत.
तरुण आणि तरुणी याआधी देखील २ ते ३ वेळा भेटले आहेत. नेहमीप्रमाणे ते भेटले आणि हॉटेलवर गेले असता ही घटना घडली. तरुणाच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमकं कारण समोर येईल. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनामुळे अनेकदा हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशाप्रकारच्या गोळ्या खाताना सावधानता बाळगण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.