Shocking : वाहतूक कोंडी ठरली जीवघेणी! ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स अडकल्याने महिलेचा मृत्यू; २६ दिवसांचं बाळ आईविना पोरकं

Hyderabad IPL Match News : आयपीएल सामन्यानंतर झालेल्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेत ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ऑक्सिजन संपल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असून २६ दिवसांचे बाळ आईविना पोरके झाले आहे.
Shocking : वाहतूक कोंडी ठरली जीवघेणी! ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स अडकल्याने महिलेचा मृत्यू; २६ दिवसांचं बाळ आईविना पोरकं
Hyderabad IPL Match NewsSaam Tv
Published On
Summary
  • आयपीएलनंतर ट्रॅफिक कोंडीत रुग्णवाहिका अडकली

  • ऑक्सिजन संपल्याने महिलेचा मृत्यू

  • २६ दिवसांचे बाळ आईविना झाले

  • व्यवस्थेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

आयपीएलची ट्रॉफी कोण उचलणार याकडे क्रिकेट प्रेमींचे सध्या लक्ष लागले आहे. अशातच एक मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. आयपीएल सामन्यानंतर स्टेडियम बाहेर झालेल्या ट्रॅफिकमध्ये एक रुग्णवाहिका अडकली. या रुग्णवाहिकेत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. तिच्या जाण्याने २६ दिवसांचं नुकतंच जन्माला आलेलं बाळ आईच्या मायेला पोरकं झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल २०२६ चा पहिला सामना, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात ५ एप्रिल २०२६ रोजी उप्पल स्टेडियमवर खेळला गेला. या दिवशी वाहतूक पोलिसांनी दुपारी १२ ते रात्री ९:५० पर्यंत नागोले ते हब्सिगुडा आणि बोडुप्पल ते अंबरपेट दरम्यान वाहतूक कोंडीचा इशारा दिला होता. तसेच पर्यायी मार्ग देखील सांगितले होते. मात्र सामना संपल्यानंतर, हजारो प्रेक्षक एकाच वेळी बाहेर पडत असताना, उप्पल जंक्शनजवळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

Shocking : वाहतूक कोंडी ठरली जीवघेणी! ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स अडकल्याने महिलेचा मृत्यू; २६ दिवसांचं बाळ आईविना पोरकं
Crime News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार; सोशल मीडियावर मैत्री करणं पडली महागात

या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका अडकली, या रुग्णवाहिकेत एक महिला मृत्यूशी झुंज देत होती. या महिलेला घेऊन जाणारी रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत तासभर अडकली. तिचा ऑक्सिजन संपला आणि त्या ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मृत महिला तीन मुलांची आई होती. तिचे सर्वात लहान बाळ, अवघे २६ दिवसांचे, ज्याला जगाची ओळखही नव्हती, त्या नवजात बाळाने आपली आई गमावली. नुकत्याच एका नवीन जीवाला जन्म दिलेल्या आईला काळाने इतक्या निर्दयपणे हिरावून घेतले, हा विचारच हृदय पिळवटून टाकणारा आहे.

Shocking : वाहतूक कोंडी ठरली जीवघेणी! ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स अडकल्याने महिलेचा मृत्यू; २६ दिवसांचं बाळ आईविना पोरकं
Shocking : डझनभर मुली, १९ हॉटेल अन्... , मास्टरमाइंड रोहितच्या मोबाइलनं केला भंडाफोड

हा प्रश्न केवळ वाहतूक कोंडीचा नाही. प्रश्न हा आहे की, जेव्हा रुग्णवाहिका अडकली होती, तेव्हा वाहतूक पोलीस कुठे होते? या घटनेवेळी रुग्णवाहिकेला मार्ग देण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती का? यावेळेस एकही अधिकारी पुढे का आला नाही? किंवा कोणीही रुग्णवाहिकेला प्राधान्य का दिले नाही? असे संतप्त प्रश्न उपस्थित होत आहेत. हा निष्काळजीपणा नाही, तर व्यवस्थेचे अपयश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com