Shocking : डझनभर मुली, १९ हॉटेल अन्... , मास्टरमाइंड रोहितच्या मोबाइलनं केला भंडाफोड

Uttar Pradesh Kanpur Crime News : कानपूरमध्ये पत्रकार असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीला महिलांची फसवणूक आणि सेक्स रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलिस सखोल तपास करत आहेत.
Shocking : डझनभर मुली, १९ हॉटेल अन्... , मास्टरमाइंड रोहितच्या मोबाइलनं केला भंडाफोड
Uttar Pradesh Kanpur Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • कानपूरमध्ये आरोपी अटकेत

  • महिलांची फसवणूक आणि शोषणाचे आरोप

  • फोनमध्ये हॉटेल्सची यादी सापडली

  • पोलिसांकडून सखोल तपास सुरू

कानपूरमध्ये रोहित वर्मा नावाच्या पत्रकाराला सेक्स रॅकेटच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून या तपासादरम्यान रोहितचे अनेक धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत. तसेच त्याच्या फोनमध्ये १९ हॉटेलची यादी सापडली आहे. रोहित महिलांना या हॉटेलवर नेवून त्यांच्यावर अत्याचार करायचा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, कानपूरच्या रावतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली आहे. महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना भेटण्यासाठी बोलवायचा आणि पैसे देतो सांगून महिलाना सेक्स रॅकेटमध्ये अडकवायचा. धक्कादायक म्हणजे रोहितने देखील अनेक महिलांवर अत्याचार केले आहेत. याप्रकरणी एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्याने रोहितच्या काळ्या कारनामांचा भांडाफोड झाला.

Shocking : डझनभर मुली, १९ हॉटेल अन्... , मास्टरमाइंड रोहितच्या मोबाइलनं केला भंडाफोड
Shocking : हृदयद्रावक! मध्यरात्री घरावर बॉम्ब हल्ला, आईच्या कुशीत झोपलेल्या २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू

या प्रकरणी रोहितला पोलिसांनी अटक केली असून तो स्वतःला युटूबर पत्रकार म्हणून सांगतो आहे. तसेच पोलीस तपासादरम्यान त्याच्या फोनमध्ये १९ हॉटेल्सची यादी आणि त्यांचे फोन नंबर सापडले आहेत. पोलिसांना असा संशय आहे कि, आरोपी याच हॉटेल्सवर सेक्स रॅकेट चालवायचा. रोहितच्या फोनमध्ये काही अश्लील व्हिडिओ देखील सापडले असल्याचं पोलिसांनी म्हटलं.

Shocking : डझनभर मुली, १९ हॉटेल अन्... , मास्टरमाइंड रोहितच्या मोबाइलनं केला भंडाफोड
Crime News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार; सोशल मीडियावर मैत्री करणं पडली महागात

या व्हिडिओमध्ये रोहित एका तरुणावर लघवी करताना पाहायला मिळत आहे, तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. आणखी एका व्हिडिओमध्ये रोहितने महिलेवर बलात्कार करताना व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com