कोरबा जिल्ह्यात ७ वर्षीय मुलाचा मृत्यू
आरोपीला काही तासांत अटक
विहिरीत मृतदेह आढळला
पोलिसांकडून सखोल तपास सुरू
Chhattisgarh Korba Rape News कोरबा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ७ वर्षीय मुलावर बलात्कार करून त्याची हत्या करण्यात आली. इतक्यावरच न थांबता आरोपींनी मुलाचा मृतदेह विहिरीत फेकून दिला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना २ एप्रिल रोजी घडली. कोरबा जिल्ह्यात पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात राहणारा सात वर्षांचा मुलगा शेजारच्या इतर मुलांसोबत तलावात अंघोळ करण्यासाठी घराबाहेर गेला होता. त्याचवेळी रणजित कुमार नावाचा एक तरुण तिथे आला. त्याने फळ खाऊ घालण्याच्या बहाण्याने मुलाला आपल्यासोबत नेले.
तिथे त्या तरुणाने मुलावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मुलाने विरोध केल्यावर रणजितला राग आला. त्याने मुलाला मारहाण केली आणि दगड उचलून मुलाच्या डोक्यावर व शरीराच्या इतर भागांवर अनेक वेळा वार केले. यामुळे मुलगा जखमी झाला, पण तरीही त्याने मुलाला सोडले नाही. त्याने मुलाला उचलले आणि शेतातील एका विहिरीत फेकून दिले. मुलाला घेऊन जात असताना रणजितला तलावात अंघोळ करत असलेल्या मुलांनी पाहिले.
गुन्हा केल्यानंतर रणजित संध्याकाळी घरी परतला. मात्र पीडित मुलगा घरी परतला नाही म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी रात्री उशिरापर्यंत आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र मुलगा कुठेही न भेटल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मुलाचा शोध घेतला असता त्यांना गावातील एका विहिरीत पीडित मुलाचा मृतदेह आढळला. याप्रकरणाचा सखोल तपास केला असता पोलिसांनी तरुणाला बेड्या घातल्या. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.