Warning Signs Of High Blood Sugar On Skin
Warning Signs Of High Blood Sugar On Skinsaam tv

High Blood Sugar: ही ५ लक्षणं दिसली तर समजा नियंत्रणाबाहेर गेलाय डायबेटीस; डॉक्टरांना लगेच करा फोन

Warning Signs Of High Blood Sugar On Skin: मधुमेह हा आजार योग्य नियंत्रणात ठेवला नाही तर गंभीर परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, काही ठराविक लक्षणे दिसल्यास ते डायबिटीज बेकाबू झाल्याचे संकेत असतात.
Published on

सध्या मधुमेह हा जगातील सर्वात सामान्यपणे दिसून येणारा एक आजार आहे. याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी तुमच्या शरीरात ब्लड शुगर वाढते तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतो. अशावेळी त्वचेवर दिसून येणारी लक्षणं वेळीच ओळखली गेली पाहिजेत.

शरीरात ब्लड शुगर वाढली की त्याची त्वचेवर कोणती लक्षणं दिसून येतात ते पाहूयात. जेणेकरून तुम्हाला त्यावर वेळेत उपचार करण्यात येतील.

शिन स्पॉट्स

शिन स्पॉट्स किंवा डायबेटिक डर्मोपॅथी ही मधुमेहाशी संबंधित सर्वात सामान्य त्वचेची समस्या आहे. याला स्पॉटेड लेग सिंड्रोम म्हणून देखील ओळखलं जातं. त्वचेवर दिसून येणारे हे स्पॉट्स गोल किंवा अंडाकृती स्पॉट्स असतात. याचा रंग ब्राऊन किंवा लालसर असू शकतात.

त्वचा काहीशी कडक होणं

ज्यावेळी तुमच्या शरीरात ब्लड शुगरचं प्रमाण वाढू लागतं तेव्हा त्वचेमध्ये कोलेजन जमा होऊ लागतं. अशावेळी त्वचा जाड होते. या स्थितीला मेडिकल टर्म स्क्लेरेडेमा डायबेटिकोरम असं म्हणतात.

Warning Signs Of High Blood Sugar On Skin
Breast Shape Change: स्तनाच्या आकारात झालेला बदल शरीराचा गंभीर इशारा असू शकतो! कॅन्सरच्या शक्यतेकडे दुर्लक्ष नको

जखम होणं

डायबेटीजमुळे शरीराच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. ब्लड शुगरचं प्रमाण सतत वाढल्याने रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यावेळी तुमच्या मज्जातंतूंना देखील नुकसान होऊ शकतं. अशावेळी झालेल्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत.

त्वचेवर पुरळ येणं

जर तुमच्या त्वचेवर अचानक लहान पुरळ दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे देखील एक धोक्याचं लक्षण असू शकतं. जर डायबेटीज नियंत्रणाबाहेर गेला तर ट्रायग्लिसराइडची पातळी वाढू लागते. अशावेळी पुरळ येतात.

Warning Signs Of High Blood Sugar On Skin
Breast cancer warning signs: महिलांनो.. स्तनाच्या त्वचेत हे ५ बदल होत असतील तर व्हा सावध; ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असू शकतो

त्वचा काळी पडणं

मान, काखेकडील भाग किंवा मांड्यांभोवतीची त्वचा काळी पडणं आणि जाड होणं हे डायबेटीजचं किंवा प्रीडायबिटीजचे लक्षण असू शकतं. या स्थितीला अ‍ॅकॅन्थोसिस निग्रिकन्स असं म्हणतात. याचा संबंध इन्सुलिन रेझिस्टन्सशी आहे.

Warning Signs Of High Blood Sugar On Skin
Brain Tumor: अचानक ताप येण्यासोबत ही ४ लक्षणं दिसली तर असू शकतो ब्रेन ट्यूमरचा धोका; कसे ओळखाल संकेत?

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com