Breast cancer warning signs: महिलांनो.. स्तनाच्या त्वचेत हे ५ बदल होत असतील तर व्हा सावध; ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असू शकतो

breast skin changes cancer symptoms: महिलांच्या आरोग्यासाठी स्तनाचा कर्करोग हा गंभीर आजार मानला जातो. डॉक्टरांच्या मते, स्तनाच्या त्वचेतील काही बदल हे कर्करोगाचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. ही लक्षणे वेळेत ओळखली नाहीत तर आजार गंभीर होऊ शकतो.
Breast cancer warning signs
Breast cancer warning signssaam tv
Published On

जगभरात कॅन्सरचं प्रमाण वाढलं असून महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येणारा कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. महिलांमध्ये कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूमागे ब्रेस्ट कॅन्सर एक प्रमुख कारण ठरलंय. कॅन्सर इंडियाच्या ऑर्गेनायझेशनुसार, भारतात प्रत्येक वर्षी दोनपैकी एका महिलेचता या कॅन्सरने मृत्यू होतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, २०२२ साली जगभरात जवळपास ६.६ लाख लोकांचा मृत्यू या कॅन्सरने झाल्याची नोंद आहे. अशामध्ये तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं ओळखली गेली पाहिजेत. ज्यामुळे मृत्यूचा धोका कमी होतो. अशावेळी शरीरातील कोणत्या बदलांककडे महिलांनी लक्ष दिलं पाहिजे ते जाणून घेऊया.

ब्रेस्टच्या त्वचेमध्ये बदल

जर अचानक महिलांच्या स्तनांच्या त्वचेचा रंग बदल असेल किंवा त्वचा आतील बाजूला खेचल्यासाठी वाटत असेल तर सावध व्हा. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी त्वचेच्या खालील टिश्यू आतील बाजूस खेचले जातात त्यावेळी असं दिसून येतं. या समस्येत महिलांना वेदनाही जाणवत नाहीत.

Breast cancer warning signs
Heart Blockage Symptoms: छातीत सतत जळजळ होतेय? अ‍ॅसिडीटी नाही, तर रक्तवाहिन्या ब्लॉकेजचा धोका, वाचा लक्षणे आणि उपाय

त्वचा लाल होऊन गरम होणं

रॅशेज किंवा इन्फेक्शनमुळे ब्रेस्टची त्वचा लाल किंवा गरम होण्याची समस्या जाणवते. याला अनेकजण एलर्जी समजून बसतात. मात्र काही दिवसांनी त्वचेचा लालपणा वाढू लागला तर डॉक्टरांची मदत घ्यावी.

स्तन अचानक भारी होणं

जर महिलांना स्तन भारी वाटू लागलं किंवा त्यांच्या त्वचा जाड होऊ लागली तर हे गंभीर संकेत असू शकतं. कोणत्याही जखमेशिवाय किंवा इन्फेक्शनशिवाय अशी तक्रार समोर येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेण आवश्यक आहे.

Breast cancer warning signs
Breast Shape Change: स्तनाच्या आकारात झालेला बदल शरीराचा गंभीर इशारा असू शकतो! कॅन्सरच्या शक्यतेकडे दुर्लक्ष नको

निप्पलमधून रक्तस्राव होणं

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, निप्पलमधून जर रक्तय येतं असेल किंवा डिस्चार्ज होत असेल तर हा गंभीर संकेत असू शकतो. खासकरून ज्यावेळी ही समस्या फक्त एका ब्रेस्टमधून होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Breast cancer warning signs
Heart Blockage Symptoms: छातीत सतत जळजळ होतेय? अ‍ॅसिडीटी नाही, तर रक्तवाहिन्या ब्लॉकेजचा धोका, वाचा लक्षणे आणि उपाय

निप्पल कोरडं पडणं

निप्पल किंवा स्तनाच्या त्वचेवर सतत कोरडेपणा किंवा फोड येत असेल तर हे महिला याकडे दुर्लक्ष करतात. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ही समस्या ब्रेस्ट कॅन्सरची देखील असू शकते.

Breast cancer warning signs
Heart blockages warning signs: हार्ट ब्लॉकेज आहेत, आधीच मिळतात हे ५ संकेत; अजिबात दुर्लक्ष करू नका

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com