Shocking: क्रिकेटच्या मैदानात रक्तरंजित थरार, रन आऊट दिल्याने अंपायरची चाकूने भोसकून हत्या

Umpire Killed in Vizag After Heated Argument: विशाखापट्टणममध्ये अंपायरची निर्घृण हत्या करण्यात आली. क्रिकेटच्या मैदानावरच ही हत्याकांडाची घटना घडली. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Shocking: क्रिकेटच्या मैदानात रक्तरंजित थरार, रन आऊट दिल्याने अंपायरची चाकूने भोसकून हत्या
Crime Nes Saam tv
Published On

Summary -

  • क्रिकेट सामन्यात रन आऊटवरून वाद

  • अंपायरवर चाकूने भोसकून हत्या

  • दुसरा अंपायर हल्ल्यात जखमी

  • आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत

क्रिकेटच्या मैदानात अंपायरची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रन आऊटच्या निर्णयावरून वाद झाल्यानंतर संतप्त झालेल्या खेळाडून अंपायरवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंपायरचा जास्त रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला. विशाखापट्टनममध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टनममध्ये क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यादरम्यान रन आऊट देण्यावरून खेळाडूंमध्ये वाद झाला. मैदानावर असलेल्या दोन्ही अंपायरने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रकरण इतके चिघळले की अंपायरची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. या सामन्यादरम्यान डोला अजिब बाबू आणि बुदुमुरी चिरंजीवी हे दोघे अंपायर होते.

Shocking: क्रिकेटच्या मैदानात रक्तरंजित थरार, रन आऊट दिल्याने अंपायरची चाकूने भोसकून हत्या
Crime: केस धरून बेदम मारहाण, धारदार शस्त्राने गळा चिरला; नंतर कारखाली चिरडलं, बारामतीच्या महिलेची कर्नाटकात हत्या

सामन्यादरम्यान रन आऊटच्या निर्णयानंतर खेळाडू तर चिडलेच पण त्याठिकाणी उपस्थित असलेल्या चाहत्यांनी देखील मैदानात धाव घेतली. दोन्ही अंपायरने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला पण एका संप्त प्रेक्षकाने अंपायरला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. सर्कल इन्स्पेक्टरने सांगितले की, दोन्ही अंपायरनी हस्तक्षेप करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. कांता किशोर नावाचा एक प्रेक्षक संतप्त झाला आणि त्याने अंपायर डोला अजिब बाबू आणि बुदुमुरी चिरंजीवी या दोघांना आणि खेळाडूंना शिवीगाळ केली.

Shocking: क्रिकेटच्या मैदानात रक्तरंजित थरार, रन आऊट दिल्याने अंपायरची चाकूने भोसकून हत्या
Crime: १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, घरी जाताना अपहरण करत फ्लॅटवर नेलं अन्...; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांनी सांगितले की, आरोपी कांता किशोर २६ वर्षीय असून त्याने नंतर प्रकरण मिटवण्यासाठी अंपायरला बाजूला बोलावले. सामना संपल्यानंतर अजित बाबू चिंरजीवी आणि त्यांचे काही मित्र तिथे आले. त्यांच्यात वाद झाला आणि किशोरने अचानक अंपायर बाबूच्या छातीत चाकू खुपसला. त्यामुळे ते जागीच कोसळले. तर दुसरा अंपायर चिरंजीवी यांच्यावर देखील त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण ते आपला जीव वाचवत पळून गेले. या हल्ल्यात अंपायर चिरंजीवी जखमी झाले आहेत. पण या घटनेत अंपायर अजित बाबूचा जागीच मृत्यू झाला. आरोपीने दारूच्या नशेत हे कृत्य केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Shocking: क्रिकेटच्या मैदानात रक्तरंजित थरार, रन आऊट दिल्याने अंपायरची चाकूने भोसकून हत्या
Pune Crime : आईने स्वत:च्या बाळाचा जीव घेतला, घराच्या ओट्यावर आपटून संपवलं; चौकशीत सांगितलं धक्कादायक कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com