IPL मध्ये खेळू दिले नाही, RCB चा स्टार खेळाडू थेट कोर्टात गेला; नेमकं प्रकरण काय?

RCB News : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा गोलंदाज नुवान तुषारा चर्चेत आलाय. RCB चा स्टार खेळाडू थेट कोर्टाला गेला आहे.
RCB
IPL Saam tv
Published On
Summary

नुवान तुषाराने श्रीलंका क्रिकेटविरोधात घेतली कोर्टात धाव

आयपीएलमध्ये खेळण्यास रोखल्यामुळे वाद

जलद गोलंदाज तुषारा आरसीबी संघाकडून खेळतो

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा जलद गोलंदाज नुवान तुषारा चर्चेत आला आहे. त्याने श्रीलंका क्रिकेट कमिटीच्या विरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. आयपीएलमध्ये खेळण्यापासून रोखल्यामुळे त्याने कोर्टात धाव घेतली आहे.

रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबी टीमसाठी तुषारा महत्वाचा खेळाडू मानला जात आहे. कारण दुसरीकडे जोश हेजलवुड सुरुवातीच्या सामन्यासाठी फिट नाहीये. त्यात तुषारा संघात नाही, त्यामुळे आरसीबीला मोठा आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने तुषाराला आयपीएल खेळण्यास एनओसी देण्यास नकार दिला आहे.

RCB
IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

श्रीलंकेच्या अनेक खेळाडूंना याच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोलकाता नाइटराडर्सने १८ कोटींना खरेदी केलेला मथीशा पथिराना आणि स्टार खेळाडू वानिंदू हसरंगा यांनाही टी२० वर्ल्डकप २०२६ दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे एनओसी मिळाली नाही.

'न्यूजवायर'च्या रिपोर्टनुसार, तुषाराने कोलंबोतील जिल्हा कोर्टात एनओसी न देण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. या प्रकरणावर पहिली सुनावणी ९ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली आहे. तुषाराने याचिकेत श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष शम्मी सिल्वा, सचिव बंडुला दिसनायके, कोषाध्यक्ष सुजीवा गोडलियाड्डा, सीईओ एशले डी सिल्वा यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. तुषाराने आयपीएलसाठी फिट असल्याचा दावा केला आहे.

RCB
IPL 2026: पराभव KKR चा, फटका मात्र CSK ला; हैदराबादच्या विजयाने बदललं पॉईंट्स टेबलचं समीकरण

श्रीलंका बोर्डाने फक्त फिटनेस मानकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुसरीकडे तुषाराने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, माझ्या क्रिकेट कारकि‍र्दीत माझा फिटनेस एक सारखाच राहिला आहे. याआधी कधीही एनओसी देण्यास नकार देण्यात आला नव्हता. माझा केंद्रीय करार हा ३१ मार्च रोजी संपलाय. आता तो वाढवण्याची इच्छा नाही. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहण्याचा प्लानविषयी बोर्डाला देखील आधीच माहिती दिली होती'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com