IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

Longest over bowled in the IPL: पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात अर्शदीप सिंगने एका ओव्हरमध्ये ११ चेंडू टाकत अनोखा विक्रम केला. वाईड आणि नो-बॉलमुळे ही ओव्हर चर्चेचा विषय ठरली आहे.
Longest over bowled in the IPL
Longest over bowled in the IPLsaam tv
Published On

मंगळवारी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पंजाबने किंग्जने गुजरात टायटन्सचा ३ विकेट्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामध्ये जी सामना पाहायला आलेल्या प्रत्येकाच्या लक्षात राहील. या सामन्यानंतर चर्चेचा विषय ठरला तो वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग.

या सामन्यात अर्शदीप सिंग त्याच्या घातक गोलंदाजीने नव्हे तर त्याने त्याच्या एका ओव्हरमध्ये फेकलेल्या ११ चेंडूंमुळे चर्चेत आहे. अर्शदीप सिंगने गुजरातविरुद्ध ११ चेंडूंची एक ओव्हर टाकली. ज्यामध्ये वाईड आणि नो-बॉलचा भडीमार होता. आयपीएलमधील चेंडूंची गणना केली तर ही सर्वात मोठी ओव्हर ठरलीये. अर्शदीपच्या आधीच पाच गोलंदाजांनी हा असा रेकॉर्ड केला आहे.

Longest over bowled in the IPL
IPL 2026: पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; चेन्नईची थेट सहाव्या स्थानावर घसरण, पहिल्या नंबरवर कोण?

शेवटच्या ओव्हरमध्ये टाकले ११ चेंडू

मंगळवारी, गुजरात टायटन्सच्या डावातील २० वी ओव्हर फेकण्यासाठी अर्शदीप सिंह आला होता. अर्शदीप सिंगने या ओव्हरमध्ये एकूण ११ चेंडू टाकले. १९ ओव्हरमध्ये गुजरातने ६ विकेट्स गमावून १५० रन्स पूर्ण केले. त्यानंतर चेंडू अर्शदीपकडे सोपवण्यात आला. ज्याने २० व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर वाईड टाकला.

Longest over bowled in the IPL
RCB Update : IPL सुरू होण्याआधीच विराटच्या बेंगळुरू संघाला मोठा झटका, आणखी एक खेळाडू स्पर्धेतून आऊट

समोर फलंदाजी करत असेलल्या राहुल तेवतियाने पुढच्या दोन चेंडूंवर एकही रन घेतला नाही. तेवतियाने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर फोर मारला. त्यानंतर अर्शदीपने एक नो-बॉल आणि दोन वाईड टाकला. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवरही रन घेतला नाही. तर तेवतियाने पाचव्या चेंडूवर एक रन घेतला. त्यानंतर अर्शदीपने पुढच्याच चेंडूवर पुन्हा वाईड टाकला. अंपायरने पुढचा चेंडूही वाईड घोषित टाकला. पण डीआरएसने तो वाईड नसल्याचं स्पष्ट केलं. अशा पद्धतीने अर्शदीप सिंगने २० व्या ओव्हरमध्ये एकूण ११ चेंडू टाकले.

Longest over bowled in the IPL
psl 2026 : क्रिकेट विश्वात खळबळ, बॉल टॅम्परिंगचा आरोप; फलंदाजावर २ सामन्यांची बंदी

आयपीएलमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक टाकलेले चेंडू

अर्शदीपच्या आधी मोहम्मद सिराज (२०२३), तुषार देशपांडे (२०२३), शार्दुल ठाकूर (२०२५), संदीप शर्मा (२०२५) आणि हार्दिक पांड्या (२०२५) या सर्वांनी एका ओव्हरमध्ये ११ चेंडू टाकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com