psl 2026 : क्रिकेट विश्वात खळबळ, बॉल टॅम्परिंगचा आरोप; फलंदाजावर २ सामन्यांची बंदी

fakhar zaman banned two matches ball tampering psl 2026 : बॉल टॅम्परिंगच्या गंभीर आरोपात दोषी आढळल्यानंतर पाकिस्तानच्या स्टार फलंदाजावर पीसीबीने दोन सामन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
क्रिकेट विश्वात खळबळ, बॉल टॅम्परिंगचा आरोप, स्टार फलंदाजावर दोन सामन्यांची बंदी
ball tampering controversy fakhar zaman psl match social media
Published On

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून पाकिस्तानमधील सर्वात मोठी पीएसएल २०२६ स्पर्धा चर्चेत आहे. आता याच पीएलएल स्पर्धेतील सामन्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. स्टार फलंदाज फखर जमाँ याच्यावर बॉल टॅम्परिंगच्या गंभीर आरोपाखाली दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान बोर्डाच्या या निर्णयामुळं क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीने ३१ मार्च रोजी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. फखर जमाँ याला कोड ऑफ कंडक्टनुसार लेव्हल ३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. हे प्रकरण अनुच्छेद २.१४ शी संबंधित आहे, असे पीसीबीकडून सांगण्यात आले.

लाहोर विरुद्ध कराची सामन्यात बॉल टॅम्परिंगचा आरोप

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये २९ मार्च रोजी लाहोर कलंदर आणि कराची किंग्ज यांच्यात सामना झाला. या सामन्यात बॉल टॅम्परिंगचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकाआधी ऑन फिल्ड पंचांनी लाहोर संघावर पाच धावांची पॅनल्टी लावली. त्यानंतर बॉल बदलण्याचा निर्णय घेतला. मैदानातील पंच शाहीद सैकत, फैसल खान अफरिदी, टीव्ही पंच आसिफ याकूब आणि चौथा पंच तारिक रशीद यांनी फखरवर हा आरोप केला. फखरने हा आरोप फेटाळून लावला आणि त्याला आव्हान देण्याचा निर्णय़ घेतला. याबाबत अनुशासनात्मक सुनावणी झाली.

दोन सामन्यांना मुकणार

मॅच रेफरी रोशन महानामा यांनी पुराव्यांची समीक्षा केली आणि फखरनं केलेला युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर निर्णय देण्यात आला. सुनावणीवेळी लाहोर संघाचा कर्णधार शाहीन शाह अफरीदी, संघ संचालक समीम राणा आणि व्यवस्थापक फारुक अन्वर हे उपस्थित होते.

लेव्हल ३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी किमान एक सामना आणि जास्तीत जास्त दोन सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते. फखर जमाँ याला कमाल शिक्षा सुनावली आहे. त्यामुळं तीन एप्रिलला मुल्तान सुल्तान्स विरुद्ध लाहोरमध्ये होणाऱ्या सामना आणि ९ एप्रिलला इस्लामाबाद संघाविरोधात कराचीत होणाऱ्या सामन्याला फखर मुकणार आहे.

क्रिकेट विश्वात खळबळ, बॉल टॅम्परिंगचा आरोप, स्टार फलंदाजावर दोन सामन्यांची बंदी
Cricket News : २ दिग्गज क्रिकेटपटूंना जीवे मारण्याची धमकी; बंदिस्त जागेत होणाऱ्या PSL वर संकटाचे काळे ढग

पीएसएलच्या नियमांनुसार, संबंधित खेळाडू या निर्णयाविरोधात ४८ तासांच्या आत स्पर्धेच्या तांत्रिक समितीकडे धाव घेऊ शकतो. फखर जमाँवर घातलेली दोन सामन्यांची बंदी ही संघाला मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. आता फखर या निर्णयाला आव्हान देतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तसेच बंदी कायम राहिली तर, त्याच्या अनुपस्थितीत संघ कशी कामगिरी करतो याबाबत पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात कमालीची उत्सुकता असेल यात शंका नाही.

क्रिकेट विश्वात खळबळ, बॉल टॅम्परिंगचा आरोप, स्टार फलंदाजावर दोन सामन्यांची बंदी
Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com