मॅट्रिमोनियल साईट्सवर वर्दी दाखवून तरुणींना लुटणारा तोतया PSI गजाआड; २० जणींना लावला लाखोंचा चुना

Fake Police Officer Arrested In Ahmedabad For Dating App Scam: अहमदाबादमध्ये मॅट्रिमोन्शियल आणि डेटिंग ॲप्सवर AI जनरेटेड पोलीस युनिफॉर्ममधील फोटो वापरून २० तरुणींना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया PSI रॉकी पांचाळला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
FAKE POLICE PSI ARRESTED FOR DUPING 20 WOMEN ON DATING APPS
FAKE POLICE PSI ARRESTED FOR DUPING 20 WOMEN ON DATING APPSsaam tv
Published On

अहमदाबादमध्ये ऑनलाइन डेटिंग अप्स आणि मॅट्रिमोनियल वेबसाईटसच्या माध्यामातून जीवनसाथी शोधणाऱ्या तरुण तरुणींची फसवणूक करणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहमदाबाद शहर गुन्हे शाखेने एका तोतया पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे. हिमांशु उर्फ रॉकी पांचाळ (वय 27) असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा राजस्थानमधील उदयपूरचा रहिवासी आहे. सध्या तो अहमदाबादच्या साबरमती भागात राहत होता.

FAKE POLICE PSI ARRESTED FOR DUPING 20 WOMEN ON DATING APPS
भयंकर! नवऱ्याने बायको- सासूचा गळा चिरला; ३ वर्षांच्या चिमुकल्यावरही वार, दुहेरी हत्यांकाडाने खळबळ

AI च्या मदतीने बनवला बनावट पोलिसाचा प्रोफाईल

आरोपीने 'बंबल', 'हिंग' यांसारख्या डेटिंग ॲप्स आणि 'शादी डॉट कॉम', 'जीवनसाथी' सारख्या मॅट्रिमोनियल साईट्सवर गुजरात पोलिसांच्या पीएसआय युनिफॉर्ममधील स्वतःचा AI-जनरेटेड (कृत्रिम बुद्धिमत्ता) फोटो अपलोड केला होता. हा प्रोफाईल पाहून संपर्कात आलेल्या तरुणींना तो प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. त्यानंतर भावनिक साद घालून आणि लग्नाचे आमिष दाखवून तो त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचा. आतापर्यंत त्याने २० हून अधिक तरुणींची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

FAKE POLICE PSI ARRESTED FOR DUPING 20 WOMEN ON DATING APPS
Raghav Chadha : भाजप प्रवेशानंतर राघव चड्ढा यांना मोदी सरकारनं दिली मोठी जबाबदारी

गुन्हे शाखेचे उपायुक्त (DCP) अजित राज्यान यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक मोबाईल फोन, ४० हजार रुपयांची रोकड, भारत सरकार, क्राइम ब्रांच सायबर सिक्युरिटी' लिहिलेले पोलीस युनिफॉर्ममधील बनावट आयडी कार्ड, गुजरात पोलिसांचे लोगो, बेल्ट, बॅज आणि अशोक स्तंभाचे स्टिकर मिळाले आहे.

FAKE POLICE PSI ARRESTED FOR DUPING 20 WOMEN ON DATING APPS
भाजपच्या बूथ अध्यक्षांचे निधन; पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात शोककळा

६ महिन्यांत २० तरुणींना गंडा; घटस्फोटित महिलांना करायचा टार्गेट

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गेल्या ६ महिन्यांत २० पेक्षा जास्त तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून फसवले आहे. यामध्ये तो प्रामुख्याने घटस्फोटित महिलांना लक्ष करायचा. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने 'कॅनव्हा' (Canva) ॲप आणि 'सिग्नेचर मेकर'चा वापर करून बनावट ओळखपत्र तयार केले होते. तसेच दुकानातून गुजरात पोलिसांचा लोगो, बेल्ट, टोपी आणि बॅज खरेदी केला होता. तरुणींना भेटताना तो या वस्तू सोबत ठेवायचा जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com