भयंकर! नवऱ्याने बायको- सासूचा गळा चिरला; ३ वर्षांच्या चिमुकल्यावरही वार, दुहेरी हत्यांकाडाने खळबळ

Husband Kills Wife And Mother In Law In Ballia UP: उत्तरप्रदेशातील बलिया येथे धक्कादायक दुहेरी हत्याकांड. नवऱ्याने पत्नी आणि सासूची गळा चिरून हत्या केली असून तीन वर्षांच्या मुलावरही जीवघेणा हल्ला. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू.
Police investigate the crime scene in Ballia after a man allegedly murdered his wife and mother-in-law and attacked family members.
Police investigate the crime scene in Ballia after a man allegedly murdered his wife and mother-in-law and attacked family members.saam tv
Published On

उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यात एक खळबळजनक दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. नगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बछईपुर गावात एका तरुणाने आपली पत्नी आणि सासूची गळा चिरून हत्या केली. एवढेच नाही तर आरोपीने आपल्या सासऱ्यावर आणि तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलावरही जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. जखमी सासऱ्याला उपचारासाठी वाराणसीला हलवण्यात आले आहे.

Police investigate the crime scene in Ballia after a man allegedly murdered his wife and mother-in-law and attacked family members.
Crime News: मामीचा कारनामा, १० वर्षे लहान भाच्यासोबत फुर्रर्रर्र...! मंदिरात जाते असं सांगून घरातून निघाली ती परतलीच नाही

नगरा भागातील अंतू गुप्ता (५५ वर्ष) यांनी आपली मुलगी प्रीती (२२ वर्ष) हिचा विवाह काही वर्षांपूर्वी गढवार भागातील अमित गुप्ता याच्याशी केला होता. मात्र, सासरी वाद होत असल्याने प्रीती गेल्या काही महिन्यांपासून आपल्या तीन वर्षांच्या मुलासह माहेरी राहत होती.

Police investigate the crime scene in Ballia after a man allegedly murdered his wife and mother-in-law and attacked family members.
Crime: केस धरून बेदम मारहाण, धारदार शस्त्राने गळा चिरला; नंतर कारखाली चिरडलं, बारामतीच्या महिलेची कर्नाटकात हत्या

आरोपी अमित शेजाऱ्याच्या भिंतीचा आधार घेत छतावरून रात्रीच्या वेळी घरात शिरला. त्याने पत्नी प्रीती, सासू सुशीला (५० वर्ष), सासरे अंतू आणि स्वतःचा मुलगा अवि यांच्यावर चाकूने सपासप वार केले. पहाटे ३ च्या सुमारास सर्वांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी प्रीती आणि सुशीला यांना मृत घोषित केले.

Police investigate the crime scene in Ballia after a man allegedly murdered his wife and mother-in-law and attacked family members.
Shocking : मटण अर्धवट शिजलं, मित्रांसमोरच नवऱ्यानं वाद घातला; अपमान सहन न झाल्यानं बायकोनं संपवली जीवनयात्रा

सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत असून घटनास्थळी स्वाट (SWAT), सर्व्हिलन्स टीम आणि फॉरेन्सिक युनिट दाखल झाले आहेत. प्राथमिक तपासात पत्नीसोबत असलेल्या वादातून हे हत्याकांड घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com