Raghav Chadha : भाजप प्रवेशानंतर राघव चड्ढा यांना मोदी सरकारनं दिली मोठी जबाबदारी

raghav chadha appointed chairman of rajya sabha petition committee : भाजप प्रवेशानंतर राज्यसभेतील खासदार राघव चड्ढा यांच्यावर मोदी सरकारनं मोठी जबाबदारी दिली आहे. चड्ढा यांनी काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
राघव चड्ढा यांच्यावर मोदी सरकारने सोपवली मोठी जबाबदारी
raghav chadha appointed chairman of rajya sabha petition committeesaam tv
Published On
Summary
  • राघव चड्ढा यांची राज्यसभेतील याचिका समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

  • काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये केला होता प्रवेश

  • राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून समितीचे पुनर्गठन

  • याचिका समितीत राज्यसभेतील १० सदस्यांचा समावेश

राज्यसभेतील खासदार राघव चढ्ढा (raghav chadha rajya sabha committee post) यांना मोदी सरकारनं मोठी जबाबदारी दिली आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजे राज्यसभेतील याचिका समितीच्या अध्यक्षपदी राघव चड्ढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चढ्ढा यांनी काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती.

राज्यसभेतील याचिका समितीचे नुकतेच पुनर्गठन करण्यात आले होते. त्यात राज्यसभेतील १० सदस्यांची नावे सूचवण्यात आली होती. राज्यसभेच्या एका अधिसूचनेनुसार, राघव चड्ढा यांना याचिका समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी २० मे रोजी या समितीचे पुनर्गठन प्रभावीपणे केले होते. या समितीच्या पुनर्गठनानंतर सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्यसभेतील १० सदस्यांची नावे सूचवली होती.

राघव चड्ढा यांच्यावर मोदी सरकारने सोपवली मोठी जबाबदारी
Vidhanparishad Election: माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? मविआ टाकणार मोठा डाव

चड्ढा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तर हर्ष महाजन, गुलाम अली, शंभू शरण पटेल, मयंककुमार नायक, मस्तान राव यादव बीधा, जेबी माथेर हिशाम, सुभाशीष खुंटिया, रंगव्रा नारजारी आणि संदोश कुमार पी यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.

राज्यसभेच्या एका अन्य अधिसूचनेनुसार, राज्यसभा सभापतींनी २० मे रोजी खासदार डॉ. मेनका गुरुस्वामी यांची कॉर्पोरेट कायदा (सुधारणा) विधेयक २०२६ वरील संयुक्त समितीच्या सदस्य म्हणून निवड केली आहे, असे राज्यसभा सचिवालयाने नमूद केले आहे.

राघव चड्ढा यांच्यावर मोदी सरकारने सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics: बच्चू कडूंना जबर धक्का! कार्यकर्त्यांनी बदलला 'भिडू'; शेकडो पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com