Vidhanparishad Election: माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? मविआ टाकणार मोठा डाव

Sonia Holkar Vidhan Parishad Election Candidature Maharashtra: विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नात सोनिया होळकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
Sonia Holkar, granddaughter of former CM Vasantdada Patil, emerges as a key face ahead of the Maharashtra Vidhan Parishad elections.
Sonia Holkar, granddaughter of former CM Vasantdada Patil, emerges as a key face ahead of the Maharashtra Vidhan Parishad elections.saam tv
Published On

नाशिक: विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी महाविकासआघाडी एकत्र लढवून महायुतीला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उपाध्यक्ष असलेल्या सोनिया होळकर यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नात आहे. मात्र त्यांच्या मातोश्री भाजपमध्ये असल्याने त्या राष्ट्रवादीकडून लढणार की भाजपकडून याबाबत ससपेन्स आहे.

Sonia Holkar, granddaughter of former CM Vasantdada Patil, emerges as a key face ahead of the Maharashtra Vidhan Parishad elections.
11th Admission 2026: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय

तसेच नाशिक आणि जळगावच्या जागेत अदलाबदल करण्याची मागणी असून नाशिक भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ही जागा सुटावी यासाठी मुंबईमध्ये ठाण मांडले होते, तर दुसरीकडे जळगावची जागा भाजपला सुटावी यासाठी तेथील पदाधिकारी देखील आग्रही आहे. विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण 622 मतदारांपैकी सर्वाधिक सदस्य भाजपचे आहेत, त्या खालोखाल शिंदेसेनेचे आणि मग राष्ट्रवादी अजित पवार यांची सदस्यसंख्या आहे. त्यामुळे महायुतीकडून लढण्यास अनेकांचा कल आहे.

Sonia Holkar, granddaughter of former CM Vasantdada Patil, emerges as a key face ahead of the Maharashtra Vidhan Parishad elections.
६० टक्के ओबीसी, ३४ टक्के मराठा; थेट आकडेवारी सांगत मनोज जरांगे भाजप आमदारासामोर भडकले|VIDEO

मात्र महाविकासआघाडी आणि सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित राहून तगडा उमेदवार देण्याची तयारी देखील केली आहेत. विरोधी आघाडी माकप, रिपाइ, इस्लाम समाजवादी पार्टी, एमआयएम यांना देखील बरोबर घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात सोनिया होळकर यांच्या नावाची चर्चा आहे. नाशिकच्या लासलगावच्या होळकरांच्या कुटुंबात असलेल्या सोनिया होळकर यांचा शहरी आणि ग्रामीण भागात चांगला प्रभाव पडू शकतो. महत्वाचे म्हणजे होळकर यांचे नातलग आणि त्यांची हक्काची मते अशी त्यांची बाजू भक्कम असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या आई ह्या सध्या भाजपमध्ये आहे. त्यामुळे त्यांना भाजपमधून देखील संधी मिळू शकते अशी ही चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com