Accident News: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; दोन जीवलग मित्रांचा करुण अंत

Mumbai-Nashik Highway Accident : मुंबई-नाशिक महामार्गावरील आटगावजवळ झालेल्या एका भीषण अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
Mumbai-Nashik Highway Accident :
MUMBAI-NASHIK HIGHWAY HORROR: TWO CLOSE FRIENDS KILLED IN HIT-AND-RUN ACCIDENTsaam tv
Published On
Summary
  • मुंबई-नाशिक महामार्गावर आटगावजवळ भीषण अपघात

  • अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

  • अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार

फैयाज शेख, साम प्रतिनिधी

मुंबई-नाशिक महामार्गावरील आटगावजवळ भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जीवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. दीप भेरे (वय १८) आणि हर्षल कांबळे (वय १९) अशी मृतांची नावे आहेत. दीप भेरे आणि हर्षल कांबळे हे दोघे जीवलग मित्र होते, अगदी जीव-सखा.

Mumbai-Nashik Highway Accident :
Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; २० वर्षीय भारतीय जवानाचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा

"सुख असो की दुःख मैत्रीचा हात कधीच सोडणार नाही" अशी मैत्री असणारे हे दोघे जिवलग मित्र. लहानाचे मोठे एकत्र झाले, सुख-दुःख एकत्र अनुभवली. या दोघांनी मृत्यूच्या वेळीही एकमेकांची साथ सोडली नाही. मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान ज्या अज्ञात वाहनाने धडक दिली त्या वाहनाचा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी मृत तरुणांच्या नातेवाईकांनी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. "महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या नराधम चालकाला तातडीने अटक करावी," अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Mumbai-Nashik Highway Accident :
Mumbai- Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, भरधाव कारमध्ये लोखंडी रेलिंग घुसली; दोघांचा जागीच मृत्यू

दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात, एक ठार

वाशिम च्या मालेगाव-मेहकर या राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी सरहद्द येथे दुचाकी आणि पिकअप वाहनामध्ये भीषण अपघात होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झालाय, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला असून, मालेगाव तालुक्यातील तीवळी येथील दोघेही युवक लग्न समारंभ आटोपून परत येत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर पिकअप चालक फरार झाला असून नागरिकांनी 108 रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com