Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; २० वर्षीय भारतीय जवानाचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा

young Army Jawan dies in Beed road accident : बीडमधील वाघिरा फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात सैन्यदलात नुकताच भरती झालेल्या जवानाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बीडमध्ये भीषण अपघातात भारतीय जवानाचा मृत्यू
Beed Accident Newssaam tv
Published On

योगेश काशिद, बीड | साम टीव्ही

Beed Accident News : अहमदपूर - अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर बीड येथे वाघिरा फाट्याजवळ आज, बुधवारी दुपारी साडेतीन वाजता भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सैन्यदलात नुकताच भरती झालेल्या जवानाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संदिपान भगवान बांगर असं अपघातात मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे. ते अवघ्या २० वर्षांचे होते. पाटोदा तालुक्यातील वाघिरा येथे बांगर राहत होते. ते मोटरसायकलवरून वाघिरा फाट्यावरून गावाकडे जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या सातारा येथील चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यात संदिपान बांगर यांचा जागीच मृत्यू झाला.

भारतीय सैन्यदलात नुकतेच झाले होते भरती

संदिपान बांगर हे बीडच्या पाटोदा तालुक्यातील वाघिरा येथे राहणारे होते. अवघ्या २० व्या वर्षी ते भारतीय सैन्यदलात भरती झाले होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यांच्या अकाली निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बीडमध्ये भीषण अपघातात भारतीय जवानाचा मृत्यू
Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लिंबागणेश पोलीस चौकीचे सहायक फौजदार गणेश परझणे, तलाठी गणपत पोतदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. बांगर यांचा मृतदेह विच्छेदनासाठी नेकनूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

बीडमध्ये भीषण अपघातात भारतीय जवानाचा मृत्यू
Accident : स्वामींच्या दर्शनाला जाताना भीषण अपघात, दीड वर्षाच्या चिमुकल्यासह २ महिलांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com