

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक
अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू
अपघातामध्ये २५ जण गंभीर जखमी झालेत
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. पालघरमधील धाणीवरी येथे वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरने धडक दिली. या अपघातात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा अधिक जखमी आहेत. जखमींना तात्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालघरच्या धानीवरी येथून वऱ्हाडाचा ट्रक लग्नासाठी जात होता. त्याचवेळी मुंबई- अहमदाबाद महामार्गावर ट्रकला कंटेनरने जोरदार धडक दिली. वऱ्हाडाच्या ट्रकमधून १०० पेक्षा अधिक जण प्रवास करत होते. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे लग्न घरावर शोककळा पसरली आहे. या अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती समोर आली नाही. पोलिस सध्या तपास करत आहेत.
वऱ्हाडाचा टेम्पो हा डहाणूतील बापूगाव येथून धाणीवर येथे साखरपुड्यासाठी जात होता. मात्र मुंबई- अहमदाबात महामार्गावरील धानिवरी येथे या ट्रकला भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने येत असतानाच गुजरातहून मुंबईकडे येणारा भरधाव कंटेनरने वऱ्हाडाच्या ट्रकला धडक दिली. अपघातानंतर दोन्ही वाहनं रसत्याच्या कडेला उटली. हा अपघात इतका भीषण होता की १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले. तर २५ जण गंभीर जखमी झाले. या अपघातातील जखमींवर सध्या कासा येथील उपजिल्हा रुग्णालय आणि धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
वऱ्हाडी ट्रकमधून जात होते. ट्रकमध्ये १०० हून अधिक जण प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की काही प्रवासी वाहनाखाली अडकले. मृतांमध्ये लहान मुलांचे देखील समावेश आहे. मृतांचा आकडा १२ वर पोहचला आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.