Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

Palghar Accident: पालघरमधील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झालेत.
Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू
Palghar AccidentSaam Tv
Published On
  • पालघरमध्ये लग्नाच्या वऱ्हाडाला भीषण अपघात

  • मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

  • वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरने धडक दिली

  • या भीषण अपघातामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला

रुपेश पाटील, पालघर

पालघरमध्ये लग्नाच्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरने धडक दिली. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. या अपघातामध्ये ३ ते ४ जणांचा मृत्यू झाला. तर २० ते २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पालघरच्या धानीवरी येथून वऱ्हाडाचा ट्रक लग्नासाठी जात होता. त्याचवेळी मुंबई- अहमदाबाद महामार्गावर ट्रकला कंटेनरने जोरदार धडक दिली. वऱ्हाडाच्या ट्रकमधून १०० पेक्षा अधिक जण प्रवास करत होते. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे लग्न घरावर शोककळा पसरली आहे. या अपघातामध्ये मृत्यू आणि जखमी झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती समोर आली नाही. पोलिस सध्या तपास करत आहेत.

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू
Magic Van Accident : मॅजिक व्हॅनची ट्रकला भीषण धडक, ९ जणांचा जागीच मृत्यू, ४ जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com