पालघर हादरले! एकाच ठिकाणी २ तरूणांचे आढळले मृतदेह; आत्महत्या की घातपात, नेमकं झालं काय?

Crime news : पालघरच्या नानिवली गावात दोन तरुणांचे संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या की घातपात? पोलिसांकडून सर्व कोनातून तपास सुरू.
Crime
CrimeSaam tv
Published On
Summary
  • पालघर नानिवली गावात दोन तरुणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळले.

  • एकाने गळफास घेतला आणि दुसरा रस्त्यावर मृत सापडला.

  • लग्नातील वादातून ही घटना घडली का?

  • दुहेरी मृत्यू प्रकरणात पालघर पोलिसांचा तपास सुरू आहे?

रूपेश पाटील, पालघर प्रतिनिधी

Crime news Maharashtra today : पालघर जिल्ह्यातील नानिवली गावात दोन तरुणांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या दुहेरी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका तरुणाचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तर त्याच परिसरापासून काही अंतरावर दुसरा तरुण रस्त्याच्या कडेला आपल्या दुचाकीसह मृतावस्थेत सापडला. एकाच वेळी घडलेल्या या दोन टोकाच्या घटनांमुळे हा घातपात आहे की अपघात, याबाबत आता संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री नानिवली गावात एक लग्नसमारंभ पार पडला. या सोहळ्यादरम्यान काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे. याच वादातून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका तरुणाने आत्महत्या केली आणि दुसऱ्याचा अपघात झाला, की या दोन्ही घटनांमागे काही वेगळे कारस्थान आहे, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. या विचित्र योगायोगामुळे पोलिसांसमोरही तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचा पंचनामा केला असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या पोलीस घटनास्थळावरील पुरावे गोळा करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. लग्नातील वादाची पार्श्वभूमी आणि मृतदेहांच्या स्थितीवरून पोलीस विविध कोनातून तपास करत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच या मृत्यूंचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मनोर पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com