Solapur road accident : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाताना पुण्यातील एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सोलापूरमधील कोंडी येथे झालेल्या भीषण अपघातात दीड वर्षाच्या चिमुकलीसह २ महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण जखमी आहेत. सिंधू खंडागळे, नंदा हाताळकर आणि रुद्राक्ष मोरे यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला.
पुण्यातील देहूरोड येथील रवि खंडागळे यांचे कुटुंब अक्कलकोटला दर्शनासाठी निघाले होते. स्वामीच्या दर्शनासाठी देहूरोडमधून निघालेले कुटुंब सोलापूरजवळ पोहचल्यावर काळा घाला घातला. कारने धावत्या ट्रकला जोरात धडक दिल्याने भयंकर अपघात झाला अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. सोलापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.
पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून पुढील तपास करण्यात येत आहे. सोलापूर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भरधाव वेगात असलेल्या ट्रकला धडकल्याची माहिती मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोंडी येथे झालेल्या भीषण अपघातात दीड वर्षाच्या चिमुकल्यासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
धावत्या ट्रकला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात सिंधू रवि खंडागळे (वय ४२), त्यांची बहीण नंदा भाऊराव हाताळकर (वय ४५) आणि दीड वर्षाचा रुद्राक्ष मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुद्राक्षचे वडील उमेश प्रकाश मोरे (वय ३२) आणि आई साक्षी मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद सोलापूरच्या सिव्हिल पोलिसात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.