ST Bus Ticket Price: एसटी प्रवास महागणार? मे महिन्यापर्यंत भाडेवाढ थांबवली; दरवाढीबाबत समोर आली मोठी अपडेट

MSRTC Latest News : डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाचा खर्च वाढला असून मे महिन्यानंतर एसटी तिकीट दर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
st bus news News
st bus newssaam tv
Published On

ST Bus Ticket Rates : गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ झाल्यामुळे प्रत्येक गोष्टीचे दर वाढत आहे. खासगी वाहनचालकांकडून दरवाढ करण्यात आली आहे, पण अद्याप एसटी महामंडळाकडून कोणतीही दरवाढ जाहीर करण्यात आली नाही. पण हा दिलासा फक्त मे महिन्यापर्यंतच राहू शकतो, कारण मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या दरवाढीचे संकेत दिले आहेत. केंद्र आणि राज्याकडून पुरवठा मिळाला नाही तर मे महिन्यानंतर एसटीच्या तिकिटाच्या किंमती वाढू शकतात, असे त्यांनी सांगितेल. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

एसटीला १० लाख ८७ हजार लिटर डिझेल लागतं. ⁠इंडियन ऑईलकडून डिझेल पुरवठा होतं आहे. पण ⁠मागील आठवड्यात डिझेलच्या दरात ३ रुपयांटी वाढ करण्यात आली. डिझेलच्या दर वाढीमुळे ३३ लाख ७० हजार रूपये आम्हाला जास्त मोजावे लागत आहेत. त्यामुळे ⁠महामंडळाचा वर्षाला १२४ कोटींचा तोटा होत आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

st bus news News
Pune Crime: पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार; कोरेगाव पार्क परिसरातील मध्यरात्रीच्या थराराने खळबळ

जागतिक पातळीवर युद्धाचा भडका उडाल्यास आणखी परिणाम होईल. ⁠पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याबाबत संकेत दिले आहेत. ⁠भविष्यात काय होईल, हे आता सांगता येत नाही. ⁠विशेष सवलत देण्याचा निर्णय झाल्यास आम्ही दरवाढ करणार नाही. ⁠उद्या मंत्रिमंडळची बैठक आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे पत्र देणार आहे. ⁠मे पर्यंत आम्ही कोणतीही भाडेवाढ करणार नाही, तोपर्यंत थांबणार आहोत. पण ⁠पुढील १० ते १२ दिवस केंद्र आणि राज्य सरकारनं पुर्तता केली तर दरवाढ करणार नाही. ⁠मात्र न झाल्यास दरवाढ करावी लागेल, असे स्पष्ट संकेत प्रताप सरनाईक यांनी दिले. ⁠ऑईल कंपनीने पूर्व किंमतीत डिझेल दिले तर दरवाढ करणार नाही. ⁠इंधनाच्या किंमती वाढल्या तर आम्हाला दरवाढ करावी लागेल. ⁠ज्या घटकांना सवलती दिल्या आहेत त्या लागू राहतील, असेही ते म्हणाले.

st bus news News
Vande Bharat sleeper : मुंबई-पुणे-बंगळुरू वंदे भारतचा मार्ग ठरला, तिकिटाच्या किंमतीही समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

मुंबईत अनाधिकृत बाईक टॅक्सी चालवल्या जात आहेत, त्याबाबत सायबर पोलिसांना पत्र लिहून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. ⁠काही ठिकाणी महिलांबरोबर गैरप्रकार घडले होते. ⁠अनेक नियम पायदळी तुडवले जात होते. ⁠कंपन्यांनी नियम पायदळी तुडवले त्यामुळे ही भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. ⁠१५ तारखेला गुगलला पत्र दिलं, त्यानंतर त्यांनी ओला उबेरच्या सरसकट गाड्यांवर बंदी घातली आहे. ⁠त्यामुळे तो घोळ झाला, त्यात फक्त अनधिकृत बाईक टॅक्सीवर कारवाई केली जाईल, असेही सरनाईक म्हणाले.

st bus news News
Pune Bribe News : पुण्यात खळबळ! प्रमोशनसाठी बड्या अधिकाऱ्याने घेतली तब्बल ४० कोटींची लाच; कॉल रेकॉर्डिंग आले समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com