Pune Crime: पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार; कोरेगाव पार्क परिसरातील मध्यरात्रीच्या थराराने खळबळ

Pune Koregaon Park News : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात मध्यरात्री चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
Pune Koregaon Park crime case
Police investigate the alleged assault case reported on Mundhwa-Koregaon Park road in Pune.Saam Tv
Published On

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

woman assaulted in moving car in Pune : पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील मुंढवा कोरेगाव पार्क रस्त्यावर एका महिलेवर धावत्या कारमध्ये बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पुण्यात संतापाची लाट उसलळी आहे. महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल कऱण्यात आला असून परिसरात तपास सुरू केला आहे. मध्यरात्री दीड वाजताच्या आसपास ही घटना घडल्याची समोर आले आहे.

रात्री पार्टीत ओळख झालेल्या पुरुषाने घरी सोडतो म्हणून कारमध्ये लिफ्ट दिली. धावत्या कारमध्ये त्या व्यक्तीने महिलेवर बलात्कार केला. पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेल मधून महिला आणि पुरुष बाहेर पडले होते. या महिलेची आणि पुरुषाची ओळख पार्टीमध्ये झाली होती, असे समोर आले आहे. पुरूषाने त्यानंतर घरी सोडण्याच्या बाहण्याने महिलेवर बलात्कार केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी कोरेगाव पारक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

Pune Koregaon Park crime case
Pune Bribe News : पुण्यात खळबळ! प्रमोशनसाठी बड्या अधिकाऱ्याने घेतली तब्बल ४० कोटींची लाच; कॉल रेकॉर्डिंग आले समोर

पुण्यासारख्या शहरात आणि त्यातही गजबजलेल्या कोरेगाव पार्क भागात चालत्या गाडीत असा थरार घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Pune Koregaon Park crime case
Vande Bharat sleeper : मुंबई-पुणे-बंगळुरू वंदे भारतचा मार्ग ठरला, तिकिटाच्या किंमतीही समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

पुण्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच कोरेगाव पार्कात घडलेल्या या घटनेमुळे पुणेकरांमध्ये संतापाची लाट आहे. पुण्यासारख्या शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगाराच्या घटनेत वाढ झाली आहे. पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. पुणे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Pune Koregaon Park crime case
HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची डेडलाइन वाढली; रजिस्ट्रेशन कसं कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com