Vande Bharat sleeper : मुंबई-पुणे-बंगळुरू वंदे भारतचा मार्ग ठरला, तिकिटाच्या किंमतीही समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

Vande Bharat Sleeper train, Mumbai Bengaluru train : मुंबई-पुणे-बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग निश्चित झाला असून ही ट्रेन पुणे-सोलापूर मार्गे धावणार आहे. जुलैपासून सुरू होणाऱ्या या ट्रेनच्या तिकीट दरांची माहितीही समोर आली आहे.
Vande Bharat Sleeper train, Mumbai Bengaluru train
Vande Bharat Sleeper train, Mumbai Bengaluru train साम टीव्ही मराठी
Published On

Mumbai pune Bengaluru Vande Bharat Sleeper Train Ticket Prices and Travel Details : मुंबई पुणे बंगळुर वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग आणि तिकिटाच्या किंमती समोर आल्या आहेत. मुंबईहून सुटणारी ही वंदे भारत एक्सप्रेस सांगली-मिरज मार्गे जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाल्या होत्या. पण आता याला पूर्णविराम लागला आहे. कारण, ही एक्सप्रेस ट्रेन सांगली मार्गे जाणार नसून पुणे-सोलापूर या मार्गे बंगळुरूला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

जुलै महिन्याच्या सुरूवातीला मुंबई-बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. रविवारी बंगळुरू-मुंबई एक्सप्रेस सुरू झाली. या एक्सप्रेसच्या जागी जुलै महिन्यात वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई-बंगळुरू या वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिटाचे दरही समोर आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, राजधानी एक्सप्रेसपेक्षाही वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिट जास्त असेल. वंदे भारत एक्सप्रेसचे तिकिट राजधानीपेक्षा जवळपास २० टक्के तिकिट जास्त असेल, असे सांगण्यात येत आहे.

Vande Bharat Sleeper train, Mumbai Bengaluru train
Rupee vs Dollar : रुपयाची 'शतकाकडे' वाटचाल? डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन गटागंळ्या का घेतेय? वाचा ५ कारणे

मागील काही दिवसांपासून ‘वंदे भारत स्लीपर’ मिरज, हुबळी मार्गे धावणार असल्याची चर्चा सुरू होती. यामुळे पुणे आणि सोलापूर मार्गावरील प्रवाशांमध्ये काहीशी नाराजी होती. त्याशिवाय सांगली मिरज मार्गे ही रेल्वे धावल्यास ‘वंदे भारत’च्या मार्गात अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच या मार्गावर अपेक्षित असा प्रवाशांचा प्रतिसाददेखील मिळणे अवघड होते. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस ही पुणे, सोलापूर या मार्गे चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतल्याचे समजतेय.

Mumbai Bengaluru Vande Bharat sleeper route

Vande Bharat Sleeper train, Mumbai Bengaluru train
राज्यात पुन्हा एकदा निवडणुका, विधान परिषदेच्या १६ जागांसाठी धुरळा, वाचा वेळापत्रक

राजधानीपेक्षा सुमारे २० टक्के जास्त तिकिट दर Vande Bharat ticket price

‘वंदे भारत स्लीपर’चे तिकीट दर निश्चित करण्यासाठी प्रति किलोमीटरचा दर ठरवण्यात आला आहे. यात ‘जीएसटी’ अतिरिक्त आकारला जातो. एक हजार किलोमीटरसाठी हे दर ठरवण्यात आले. ‘वंदे भारत स्लीपर’मध्ये प्रवाशांना किमान ४०० किलोमीटरचे भाडे देणे बंधनकारक असेल. २०० किमीचा प्रवास असला तरीही ४०० किमीचेच भाडे द्यावे लागेल.

तृतीय वातानुकूलित (थर्ड एसी) : २.४० प्रति किलोमीटर या दराने २ हजार ४०० रुपये.

सेकंड एसी : ३.१० प्रति किलोमीटर या दराने ३ हजार १०० रुपये.

फर्स्ट एसी : ३.८० प्रति किलोमीटर या दराने ३ हजार ८०० रुपये.

(हे दर जीएसटी वगळून आहेत)

राजधानी एक्स्प्रेसचे तिकीट दर (१००० किमी प्रवासासाठी)

थर्ड एसी : सुमारे २.१० ते २.१४ प्रति किलोमीटर दराने अंदाजे २,१०० ते २,१४०.

सेकंड एसी : सुमारे २.८५ ते २.९१ प्रति किलोमीटर दराने अंदाजे २,८५० ते २,९१०.

फर्स्ट एसी : सुमारे ३.५३ ते ३.६० प्रति किलोमीटर दराने अंदाजे ३,५३० ते ३,६००.

Vande Bharat Sleeper train, Mumbai Bengaluru train
Vande Bharat Sleeper : महाराष्ट्राला मिळाली पहिली वंदे भारत स्लीपर, कुठून कुठे धावणार? कोणती स्थानके? वाचा A टू Z माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com