Vande Bharat Sleeper : महाराष्ट्राला मिळाली पहिली वंदे भारत स्लीपर, कुठून कुठे धावणार? कोणती स्थानके? वाचा A टू Z माहिती

Vande Bharat Sleeper train, Mumbai Bengaluru train : महाराष्ट्राला पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळणार असून मुंबई ते बंगळुरू प्रवास आता फक्त १६ तासांत पूर्ण होणार आहे.
Vande Bharat Sleeper
New Vande Bharat Sleeper Train NewsSaam Tv
Published On

Mumbai pune Bengaluru Vande Bharat Sleeper Train : मुंबई, पुणेकरांचे वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करण्याचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे. कारण, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील पहिल्या आणि भारतामधील दुसऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच मुंबई ते बंगळुरू हा प्रवास वंदे भारत स्लीपरमुळे अधिक वेगवान आणि सुखद होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन रात्रीच्यावेळी चालवली जाऊ शकते, कोणकोणत्या स्थानकात ही ट्रेन थांबणार आहे, याबाबतची अधिकृत माहिती समोर आली नाही.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते केएसआर बंगळुरू दरम्यान स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस (Sleeper Vande Bharat Express) सुरू करण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. महाराष्ट्र राज्याला मिळणारी ही पहिलीच 'स्लीपर' वंदे भारत ट्रेन आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा (long-distance passengers) वेळ वाचणार आहे. सध्या मुंबई-बंगळुरू मार्गावर राजधानीसारखी कोणतीही हाय-स्पीड ट्रेन उपलब्ध नाही. त्यामुळे ही ट्रेन प्रवाशांसाठी सर्वात वेगवान पर्याय ठरणार आहे.

Vande Bharat Sleeper
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात संतापाची लाट! लाडक्या बहि‍णीकडे शरीरसुखाची मागणी, eKYC साठी घरी गेला अन्...

मुंबई ते बंगळुरू हे ११३५ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 'उद्यान एक्सप्रेस'सारख्या गाड्यांना सध्या २२ ते २३ तास लागतात. मात्र, ही नवी वंदे भारत स्लीपर ट्रेन हे अंतर फक्त १६ तासांत पूर्ण करेल अशी शक्यता आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन रात्रीच्या वेळी चालवली जाण्याची चिन्हे आहेत. आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि व्यावसायिकांना याचा मोठा फायदा होईल. ही स्लीपर ट्रेन १६ डब्यांची असेल आणि तिचा वेग ताशी १८० किमी पर्यंत जाऊ शकतो. एकाच वेळी सुमारे ८२३ प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करू शकतील.

Vande Bharat Sleeper
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानचा २३ वा हप्ता हवाय? मग 'हे' काम लगेच करा

केंद्र सरकारने २०२६ अखेरपर्यंत देशभरात एकूण १२ स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातील पहिली ट्रेन जानेवारी २०२६ मध्ये कामाख्या-हावडा मार्गावर सुरू झाली होती. आता मुंबई-बंगळुरू मार्गावर ही सेवा सुरू झाल्यामुळे महाराष्ट्राच्या रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल पाहायला मिळेल. या ट्रेनचे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नाही. पण या वर्षात ही ट्रेन रुळावर धावताना दिसेल. दरम्यान, मुंबई-बंगळुरू रेल्वेचे दोन मुख्य मार्ग आहेत. एक पुणे-मिरज-हुबळी (मिरज लाईन) आणि दुसरा पुणे-सोलापूर-गुंटकल (सोलापूर लाईन) या मार्गे जाऊ शकते. रेल्वेकडून अद्याप अधिकृत मार्ग जारी करण्यात आला नाही.

Vande Bharat Sleeper
Aadhaar Offline KYC : न OTP येणार, न बायोमेट्रिक्स लागणार! आधार कार्डमध्ये झाला मोठा बदल, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com