राज्यात पुन्हा एकदा निवडणुका, विधान परिषदेच्या १६ जागांसाठी धुरळा, वाचा वेळापत्रक

Maharashtra MLC election : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १८ जून रोजी मतदान होणार असून संबंधित मतदारसंघांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
Maharashtra Vidhansabha
Maharashtra VidhansabhaSaam Tv
Published On

Maharashtra Legislative Council election 2026 schedule : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या (Legislative Council) १६ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक (Local Authorities' Constituencies) जाहीर झाली आहे. ६ जागा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १८ जून रोजी या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

कोणत्या १६ जिल्ह्यात होणार निवडणुका ?

विधान परिषदेच्या ज्या १६ आमदारांच्या जागा भरल्या जाणार आहेत, त्यामध्ये सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद, परभणी आणि संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. 'या' १६ मतदारसंघांमध्ये होणार निवडणूक आणि आचारसंहिता लागू निवडणूक जाहीर झाल्यामुळे संबंधित मतदारसंघांमध्ये आचारसंहिता (Model Code of Conduct) तातडीने लागू झाली आहे.

Maharashtra Vidhansabha
पेट्रोलवर सरकारचा मोठा निर्णय, करात ३ रुपयांची वाढ, इंधनाच्या दरात आणखी वाढ होणार होणार?

निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक

अधिकृत अधिसूचना जारी होणार - २५ मे २०२६ (सोमवार)

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख - ०१ जून २०२६ (सोमवार)

उमेदवारी अर्जांची छाननी - ०२ जून २०२६ (मंगळवार)

अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस - ०४ जून २०२६ (गुरूवार)

मतदान (Date of Poll) -१८ जून २०२६ (गुरूवार) (सकाळी ८ ते दुपारी ४)

मतमोजणी (Counting of Votes) - २२ जून २०२६ (सोमवार)

निवडणुका का रखडल्या होत्या?

नियम आणि अटींनुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार निवडून आणण्यासाठी तिथल्या किमान ७५% लोकल बॉडीज (स्थानिक संस्था) भरलेल्या असणे आवश्यक असते. महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे या जागा रिक्त होत्या आणि निवडणुका रखडल्या होत्या. परंतु, आता राज्य निवडणूक आयोगाने याविषयीची आवश्यक ती माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेची अट पूर्ण झाल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने या १६ जागांसाठी अधिकृतपणे बिगुल फुंकले आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील स्थानिक पातळीवरील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापणार आहे.

Maharashtra Vidhansabha
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो ₹१५०० मिळत नाही? टेन्शन सोडा, सरकारने घेतला मोठा निर्णय; आता प्रत्येक जिल्ह्यात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com