Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो ₹१५०० मिळत नाही? टेन्शन सोडा, सरकारने घेतला मोठा निर्णय; आता प्रत्येक जिल्ह्यात...

Ladki Bahin Yojana Re Verification: लाडकी बहीण योजनेत महिलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता महिलांना जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

सरकारने महिलांना दिली आणखी एक संधी

आता महिलांना ऑफलाइन पद्धतीने करावी लागणार कागदपत्र सादर

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अपात्र ठरलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना कागदपत्र सादर करण्यासाठी एक संधी मिळणार आहे. ऑनलाइन पडताळणीत अडथळे आलेल्या महिलांना आता जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रे सादर करायची आहेत. त्यामुळे योजनेत वंचित महिलांना एक संधी मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: मार्चचे ₹१५०० जमा; लाडक्या बहिणींना एप्रिल-मे महिन्याचे ₹३००० कधी येणार?

राज्य सरकारचा मोठा निर्णय (Government Big Decision on Ladki Bahin Yojana)

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकत्र दिले आहेत. यामध्ये जवळपास १ कोटी ७७ लाख महिलांना पैसे मिळाले आहेत. लाखो महिला अपात्र ठरल्या आहेत. गेल्या दीड वर्षात अनेक टप्प्यांमध्ये पडताळणी झाली. यातून महिलांचे अर्ज बाद करण्यात आले.

लाडकी बहीण योजनेत ई केवायसी आणि कागदपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु अनेक तांत्रिक समस्या, आधार-बँक अकाउंट लिंक करण्यातील त्रुटी, मोबाईल नंबरमध्ये बदल या अशा अनेक कारणांमुळे लाखो महिलांची पडताळणी पूर्ण झालेली नाही.

काही महिलांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित आहे, अनेक महिलांना कागदपत्र अपलोड करण्यास अडचणी आल्या आहेत. त्यामुळे आता महिलांना ऑफलाइन पद्धतीने कागदपत्र सादर करावे लागणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींना मिळाला नाही मार्च-एप्रिलचा हप्ता; खात्यात आले नाही ₹३०००; नेमकं कारण काय?

तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही पात्र महिलेचा लाभ बंद होऊ नये,यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन ई केवायसी न केलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रे सादर करायची आहे. यानंतर अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी करुन अर्ज तपासले जाणार आहेत. यानंतर पात्र महिलांना पुढील टप्प्यात पैसे दिले जाणार आहेत.

जिल्हास्तरावर महिला व बालविकास विभागाकडून विशेष मदत केंद्र सुरु करण्याची तयारी आहे. येथे महिलांच्या अडचणी दूर करण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले जाणार असल्याचे सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: पुन्हा ईकेवायसी सुरू होणार? एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहि‍णींना दिला शब्द, वाचा नेमकं काय म्हणाले?
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com