डाव्यांनी अखेरचं राज्य गमावलं, 60 वर्षात प्रथमच देशात डाव्यांचं सरकार नाही

Congress Alliance Sweeps Kerala: विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये सत्तांतर होऊन काँग्रेस आघाडीने बहुमत मिळवलं आहे. या निकालाने डाव्यांचा शेवटचा बालेकिल्लाही कोसळला आहे. 5 दशकात प्रथमच देशात डाव्यांचं सरकार नसणार आहे.
Congress supporters celebrate in Thiruvananthapuram after the alliance secures a historic victory, ending the Left Front’s decade-long rule in Kerala.
Congress supporters celebrate in Thiruvananthapuram after the alliance secures a historic victory, ending the Left Front’s decade-long rule in Kerala.saam tv
Published On

देशातील डाव्या विचारांचा अखेरचा बुरूजही ढासळलाय....केरळमध्ये डाव्यांची १० वर्षांची सत्ता काँग्रेसनं उलथवून लावलीय. पी. विजयन यांच्या नेतृत्त्वात डाव्यांची सत्ता असलेलं केरळ हे देशातलं अखेरचं राज्य होतं. आता तेही डाव्यांच्या हातातून गेल्यामुळे डाव्या पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. विजयाचा कल स्पष्ट होताच तिरुवनंतपुरम येथील काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. "आता वेळ केवळ सत्ता बदलण्याची नाही, तर धोरण बदलण्याची आणि केरळच्या पुनरुज्जीवनाची आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी दिली.

काँग्रेसच्या यशानंतर मुख्यमंत्रीपदासाठी शशी थरुर यांच्याबरोबरच के. सी. वेणुगोपाल, व्ही.डी. सतीशन आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या नावांची चर्चा आहे. "भारत काँग्रेसमुक्त झाला नाही, पण आता तो डावेमुक्त होण्याच्या मार्गावर आहे," अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून येत आहे. डावे आणि काँग्रेसची आलटून पालटून सत्ता येत होती. त्याला २०२१ ची निवडणूक अपवाद ठरली. या निवडणुकीत पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीने सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली होती.

केरळमधील डाव्या सरकारचा (LDF) पराभव झाल्याने, 50 वर्षांत पहिल्यांदाच देशात एकाही राज्यात डाव्यांचे सरकार नसेल. डाव्या पक्षांनी पश्चिम बंगालमध्ये 1977 ते 2011 मध्ये एकहाती सत्ता गाजवली. 34 वर्षे पश्चिम बंगालवर राज्य करणाऱ्या डाव्या पक्षांना ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने 2011 मध्ये सत्तेतून बाहेर केले. त्रिपुरा राज्यात डाव्यांनी 1993 ते 2018 या काळात सत्ता स्थापन केली. 2018 मध्ये त्रिपुरातील डाव्यांची सत्ता भाजपच्या हाती गेली. 2023 मध्येही त्रिपुरात भाजपचा विजय झाला. 2004 मध्ये डाव्या पक्षांकडे लोकसभेच्या 59 जागा होत्या. 2009 मध्ये 24 खासदार निवडून आले. ही संख्या हळूहळू कमी झाली. 2014 मध्ये 10 आणि 2019 च्या निवडणुकीत फक्त 5 खासदार विजयी झालेत. निवडणूक आयोगाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (CPI)राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे.

भारतीय समाजव्यवस्थेत जातीच्या प्रश्नावर डावे पक्ष योग्य भूमिका घेण्यास अपयशी ठरल्याची टीका होतेय. दुसरीकडे निवडणूक आता धनशक्तीचा खेळ झालाय. बाहुबली नेते, कॉर्पोरेट कल्चर, संघटनात्मक ताकद आणि निधीची कमतरता यामुळे स्पर्धेच्या युगात डावे कमी पडत आहेत. भविष्यात डाव्या पक्षांची एकजूट होऊन पुन्हा सामान्य जनतेशी नाळ जुळणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com