HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची डेडलाइन वाढली; रजिस्ट्रेशन कसं कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

HSRP Number Plate Installation Process: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची प्रोसेस वाचा.
HSRP Number Plate
HSRP Number PlateSaam Tv
Published On
Summary

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची डेडलाइन वाढली

एचएसआरपी नंबरपल्टे बसवायची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता राज्य शासनाने एचएसआरपी नंबरप्लेटबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची मुदत दीड महिन्याने वाढवून देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व वाहनधारकांना ३० जून २०२६ पर्यंत एचएसआरपी नंबरप्लेट बसवायची आहे. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी माहिती दिली आहे. त्यामुळे ज्या वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही त्यांना दिलासा मिळाला आहे.

HSRP Number Plate
HSRP Number Plate: फक्त ४ दिवस! HSRP नंबरप्लेट नसेल तर दररोज ₹१००० दंड, वाचा सविस्तर

या तारखेपर्यंत बसवा एचएसआरपी नंबरप्लेट (HSRP Number Plate Deadline Extended)

याआधीही एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांना मुदतवाढ देण्यात आली होती. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आली होती. मात्र, तरीही लाखो वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नाही. राज्यातील कामाचा आढावा घेतल्यानंतर आता ही मुदत तेव्हापासून ६ महिन्यांनी ३० जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. १ जुलै २०२६ पासून दंड आकारला जाणार आहे. ज्या वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही त्यांना १ हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

वाहनधारकांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊनच एचएसआरपी (HSRP) नंबरप्लेट बसवायची आहे. कोणत्याही एजंटद्वारे एचएसआरपी नंबरप्लेट बसवू नये, असं आवाहन परिवहन मंत्र्‍यांनी केलं आहे. राज्यातील सर्व वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असून त्याला सहकार्य करावे, असं प्रताप सरनाईकांनी सांगितले.

HSRP Number Plate
HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

HSRP नंबरप्लेटसाठी रजिस्ट्रेशन कसं करावं? (HSRP Number Plate Installation process)

सर्वात आधी तुम्हाला परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर transport.maharashtra.gov.in जायचे आहे.

यानंतर Apply High Security Registration Plate Online वर क्लिक करा.

यानंतर ऑर्डर एचएसआरपीवर क्लिक करा. यानंतर वाहनांचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर, इंजिन नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येईल. त्यावर क्लिक करुन पेमेंट करायचे आहे.

तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल. त्यानंतर जवळच्या एजन्सीत अपॉइंटमेंट बुक करा.

एजन्सीत जाऊन दिलेल्या तारखेला नंबरप्लेट बसवून घ्यायची आहे.

HSRP Number Plate
HSRP Number Plate: अजूनही HSRP नंबरप्लेट बसवता येणार का? रजिस्ट्रेशन कसं करायचं? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com