HSRP Number Plate: अजूनही HSRP नंबरप्लेट बसवता येणार का? रजिस्ट्रेशन कसं करायचं? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस
HSRP नंबरप्लेट बसवण्याची डेडलाइन संपली
अजूनही एचएसआरपी नंबरप्लेट बसवता येणार का?
दंड किती भरावा लागणार?
राज्य सरकारने सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. दरम्यान, आता एचएसआरपी नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाहनधारकांना आता दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे अजूनही ज्यांनी नंबरप्लेट बसवली नाही त्यांनी बसवायची आहे. जर असं केलं नाही तर तुम्हाला दररोज १००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
राज्यातील फक्त ५० टक्के वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली आहे.राज्यातील १ कोटी २ लाख २८ हजार वाहनधारकांनी नोंदणी केली आहे. त्यातील ८८ लाख ३० हजार वाहनांनी नंबरप्लेट बसवलेली आहे. फक्त ४९ टक्के वाहनधारकांना रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामुळे इतर वाहनांना दंड भरावा लागणार आहे.
अजूनही एचएसआरपी नंबरप्लेट बसवता येणार का? (Can we Still Install HSRP Number Plate)
एचएसआरपी नंबरप्लेट रजिस्ट्रेशन तुम्ही अजूनही करु शकतात. यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने रजिस्टर करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट घेतल्यानंतर एचएसआरपी नंबरप्लेट बसवून मिळणार आहे.
सर्वात आधी तुम्हाला transport.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर Apply High Security Registration Plate Online वर जायचे आहे.
यानंतर ऑर्डर एचएसआरपीर क्लिक करा. यानंतर वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर टाका.
यानंतर पेमेंटचा ऑप्शन दिसेल. त्यानंतर शुल्क भरा.
तुम्हाला एक रिसिप्ट मिळणार आहे. यानंतर जवळच्या एजन्सीत अपॉइंटमेंट बुक करायची आहे.
तुम्हाला दिलेल्या तारखेला जाऊन नंबरप्लेट बसवून घ्यायची आहे.
दंड किती भरावा लागणार?
जर एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दररोज दंड भरावा लागणार आहे. १००० ते १०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. यामुळे ज्या वाहनधारकांनी अजून नंबरप्लेट बसवली नाही त्यांना फटका बसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

