HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेटची मुदत संपली; आता दररोज १००० रुपयांचा दंड | VIDEO

HSRP Number Plate Deadline: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख आता संपली आहे. एचएसआरपी नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनधारकांकडून आता दंड वसूली केली जात आहे.

महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. HSRP नंबर प्लेट लावण्याची मुदत आता संपली आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत दिली होती. दरम्यान, आता ही मुदत संपून बरेच दिवस झाले आहेत. त्यानंतर १८ फेब्रुवारीपासून आरटीओकडून कारवाई सुरू झाली आहे. राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त वाहनधारकांनी अद्याप HSRP प्लेट बसनलेली नाही . विना-HSRP वाहन चालवणाऱ्यांना 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. वाहनधारकांनी लवकरात लवकर HSRP प्लेट लावण्याचे निर्देश दिले आहेत. दरवेळी तुम्हाला १००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे ज्या वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नाही. त्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com