HSRP Number Plate: वाहनचालकांना झटका! HSRP नंबरप्लेट बसवली नाही 'या' तारखेपासून कारवाई होणार; किती दंड भरावा लागणार?

HSRP Number Plate Penalty: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची तारीख उलटू गेली आहे. तरीही अजून अनेक वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवलेली नाही. दरम्यान, आता या वाहनधारकांवर कारवाई होणार आहे.
HSRP Number Plate
HSRP Number PlateSaam Tv
Published On
Summary

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास दंड

१८ तारखेपासून होणार कारवाई

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्व वाहचालकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. दरम्यान, आता डेडलाइन संपल्यानंतरही लाखो वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवलेली नाही. त्यामुळे परिवहन विभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. आता ज्या वाहनांना नंबरप्लेट नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

HSRP Number Plate
HSRP Number Plate: HSRP नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख काय? या तारखेपूर्वी करा काम अन्यथा बसणार दंड

वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले होते. अनेकांनी अजूनही हे काम केले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दंड वसूली केली जाणार आहे. १८ फेब्रुवारीपासून वाहनांवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत परिवहन आयुक्त विवेक भिमनगर यांनी दिले आहेत.

HSRP Number Plate
HSRP Number Plate : HSRP नंबरप्लेट अजून लावली नाही, नव्या वर्षात भरावा लागणार १०,००० रुपयांचा दंड, वाचा सविस्तर

या तारखेपासून होणार कारवाई

वाहनधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे परंतु त्यांना अजूनही नंबरप्लेट मिळालेली नाही. अशा वाहनधारकांसाठी प्रशासनाने १५ दिवसांची मुदत दिली आहे. या वेळेत नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच १८ फेब्रुवारीनंतर कारवाई केली जाणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लाखो वाहनधारकांनी अजूनही नंबरप्लेट बसवलेली नाही. जवळपास २४ लाखांहून अधिक वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवायची होती. मात्र, फक्त साडेआठ लाख वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवली आहे. जवळपास ६५ टक्के वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवलेली नाही.त्यामुळेच हा कारवाईचा बडगा उचलला आहे.

किती दंड भरावा लागणार? (HSRP Number Plate Fine)

एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास तुम्हाला रोख रक्कम दंड भरावा लागणार आहे. १,००० रुपयांपासून ते १०,००० रुपयांपर्यंत दंड तुम्हाला भरावा लागू शकतो.

HSRP Number Plate
HSRP नंबरप्लेट न बसवल्यास होणार दंड; परिवहन विभागाची कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com