JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?

JEE Mains Exam: जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारीला लागावे कारण परीक्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जेईई मेन्स सेक्शन १ आणि सेक्शन २ ची परीक्षा कधीपासून सुरू होणार यासाठी वेळापत्रक एकदा वाचा...
JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?
JEE Mains Exam 2026Saam tv
Published On

Summary -

  • JEE मेन्स २०२६ मेन्स परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार

  • सत्र १ ची परीक्षा २१ ते ३० जानेवारीदरम्यान घेतली जाणार

  • तर सत्र २ ची परीक्षा १ ते १० एप्रिलदरम्यान घेतली जाणार

  • अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर वेळापत्रक पाहता येईल

जेईई मेन्स परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन्स २०२६ परीक्षाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परीक्षेचे आयोजन २ सत्रांमध्ये करण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून या परीक्षा देशभरातील विविध नियुक्त केंद्रांवर घेतली जाईल.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केलेल्या वेळापभकानुसार, जेईई मुख्य सत्र १ ची परीक्षा २१ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. जेईई मुख्य सत्र २ च्या परीक्षा १ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. जेईई परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब वेळापत्रक तापसून परीक्षेच्या तयारील लागावे.

JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?
JEE Main Result: नागपूरचा निलकृष्ण गजरे JEE परीक्षेत देशात पहिला, शेतकरी पुत्राचे होतेय कौतुक

जाहीर झालेल्या तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, जेईई मेन २०२६ सत्र १ साठी नोंदणी प्रक्रिया ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरू होईल. सत्र २ साठी अर्ज प्रक्रिया जानेवारी २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल. शिक्षण मंत्रालयाने जेईई मेन परीक्षा घेण्यासाठी जेईई एपेक्स बोर्डची पुनर्रचना केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अभ्यासक्रमात काही बदल केले जाऊ शकतात. अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत सूचना नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जारी केलेली नाही.

JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?
UPSC Success Story : वाह रे पठ्ठ्या! २ वेळा JEE पास करून IIT सोडलं; UPSC उत्तीर्ण होऊन IAS पदाचा राजीनामा, कोण आहे 'हा' जिगरबाज तरूण?

जेईई परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा?

- अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.

- होम पेजवर दिलेल्या जेईई मेन्स २०२६ सत्र १ नोंदणी लिंकवर क्लिक करा.

- तपशील प्रविष्ट करून नोंदणी करा आणि संपूर्ण अर्ज भरा.

- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

- फी भरा आणि सबमिट करा.

- अर्ज भरल्याची प्रिंट आऊट काढून घ्या.

JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?
Success Story: पुस्तकी किडा नव्हे; खेळ खेळून ठरला जेईई २०२५ मेनचा टॉपर, JEE उत्तीर्ण अर्णव सिंग याचा प्रेरणादायी प्रवास

जेईई मेन्सच्या गुणांमुळे आणि रँकमुळे देशभरातील एनआयटीमधील बी.टेक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. या परीक्षेतील अव्वल क्रमांकाचे विद्यार्थी नंतर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेला देखील बसतात. जेईई अॅडव्हान्स्ड गुणांमुळे आयआयटीमधील बी.टेक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. जेईई मेन्स २०२६ परीक्षेबाबत जर अधिक माहिती पाहिजे असल्यास विद्यार्थी अधिकृत एनटीए वेबसाइटला भेट देऊ शकतात.

JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?
JEE Main Result 2025: जेईई मेनचा निकाल जाहीर, २४ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण; कसा आणि कुठे चेक कराल रिझल्ट?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com