जेईई मेन २०२४ चा (JEE Main 2024) निकाल आज जाहीर करण्यात आला. JEE परीक्षेत नागपूरच्या निलकृष्ण गजरेने (Nilkrishna Gajare) बाजी मारली आहे. निलकृष्ण गजरे या परीक्षेमध्ये देशात पहिला आला आहे. शेतकरी कुटुंबातील निलकृष्ण गजरेवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. निलकृष्ण गजरेने 300 पैकी 300 गुण मिळवत देशामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. निलकृष्ण हा शेतकरी कुटुंबातील मुलगा असून तो वाशीम जिल्ह्यातील छोट्याश्या गावामध्ये राहतो.
निलकृष्ण हा वाशीम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील बेलखेड या गावामध्ये राहतो. निलकृष्णने 11वी पर्यंतचे शिक्षण वाशीम जिल्ह्यातच घेतलं आहे. त्यानंतर आयआयटीत प्रवेश मिळवण्यासाठी निलकृष्णने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून घेतल्या जाणाऱ्या जेईई परीक्षेसाठी नागपूरमधील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये अभ्यास केला.
आयआयटी मुंबईत इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्याने गेल्या दोन वर्षांपासून कठोर परिश्रम घेत अभ्यास केला. सकाळी पाच वाजल्यापासून तो अभ्यासाला सुरूवात करायचा. दररोज जवळपास 12 तास तो नियमितपणे अभ्यास करत होता. निकाल लागल्यानंतर देशात पहिले आल्याचे कळताच निलकृष्णला प्रचंड आनंद झाला.
निलकृष्णाचे वडील निर्मल गजरे हे शेतकरी आहेत. मुलगा हुशार असल्याने त्याच्यासाठी कठोर परिश्रम घेत चांगल्या सोयी सुविधा देण्याचे काम त्यांनी केले. मुलाच्या शिक्षणासाठी निलकृ्ष्णची आई योगिता या गेल्या दोन वर्षांपासून त्याच्यासोबत नागपूरमध्येच राहत आहेत. निलकृष्णने आपल्या यशाचे सर्व श्रेय आई-वडिलांना आणि शिक्षकांना दिले.
निलकृष्ण हुशार आहे त्यामुळे नक्कीच तो चांगले मार्क्स मिळवेल असा विश्वास त्याच्या आई-वडिलांना होता. मात्र निलकृष्ण देशात पहिला आल्याने त्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला. दरम्यान, जेईई मेन २०२४ परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. एप्रिल सत्रातील जेईई मेन परीक्षेमध्ये ५६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमधील सर्वात जास्त विद्यार्थी हे तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीतील आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.