Nagpur News : क्रूरतेचा कळस! माथेफेरू तरुणाकडून श्वानाला अमानुष मारहाण; तरफडून मृत्यू

Nagpur Crime News : अजय सांगोला असं या व्यक्तीचं नाव आहे. नागपुरातील गोरेवाडा परिसरात अजय सांगोला हा राहत असून घटना घडली तेव्हा तो दारूच्या नशेत होता असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
Nagpur News
Nagpur NewsSaam TV

पराग ढोबळे

Nagpur News :

नागपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका माथेफिरूने लोखंडी रॉडने मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यू झालाय. श्वानप्रेमी संघटनेकडून याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Nagpur News
Nagapur News: राम मंदिर सोहळ्यानिमित्त कोराडी येथे सात हजार किलोचा प्रसाद, फडणवीसांनीही रामहलवा बनवण्यास केली मदत

गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. माथेफिरू व्यक्तीने आपला सर्व राग या श्वानावर काढला आहे. कुत्र्याला मारत असताना तेथे काही स्थानिक महिला आणि मुली उपस्थित होत्या. त्यांनी या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो थांबला नाही. त्याने थेट महिलांना देखील शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

अजय सांगोला असं या व्यक्तीचं नाव आहे. नागपुरातील गोरेवाडा परिसरात अजय सांगोला हा राहत असून घटना घडली तेव्हा तो दारूच्या नशेत होता असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. दारूच्या नशेत असताना तो परिसरात गुंडागर्दी करतो त्यानंतर त्याला कोणीच मिळाला नाही तर मोकाट श्वान आणि जनावरांना मारहाण करतो असंही स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=W-jcmJkQDfwदोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अशाच पद्धतीने मोकाट श्वान त्याला दिसून आले. त्याने रागाच्याभरात लोखंडी रॉड घेऊन त्या श्वानाला मारलं. श्वान हे इकडे तिकडे सैरावैरा पळत असताना सुद्धा त्याने त्याचा पाठलाग करून क्रूरपणे लोखंडी रॉडने मारहाण करणे सुरूच ठेवले. यावेळी स्थानिकांनी त्याला हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने स्थानिकांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर श्वान मेल्यानंतर त्याला उचलून फरपटत नेत फेकून दिले.

श्वानांसाठी काम करणाऱ्या नागपुरातील द सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या सदस्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी स्थानिक नागरिकांशी बोलून या सगळ्या संदर्भात गिट्टीखदान पोलिसा तक्रार दिली. पोलिसांनी सुद्धा या संदर्भात अजय सांगोला विरोधात प्राणी क्रूरता अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करून घेतलाय.

अजय सांगोल्याने यापूर्वी अनेक श्वानांना मारल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. द सेव्ह स्पिचलेस ऑर्गनायझेशनच्या संस्थापिका स्मिता मिरे यांनी अशा पद्धतीने क्रूरपणे श्वानांना मारणाऱ्या अजय सांगोल्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

Nagpur News
Pune Crime News : मित्राच्या मदतीने मुलीने केली आईची हत्या; थरारक घटनेनं पुणे हादरलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com