Success Story : पुण्यातील होमगार्डच्या लेकाने देशात नाव गाजवलं; खडतर प्रवासात जेईई अ‍ॅडव्हान्समध्ये मोठं यश

JEE Result 2025 : पुण्याच्या जुन्नरमधील होमगार्डच्या लेकाने देशात नाव गाजवलं आहे. या मुलाने खडतर प्रवासात जेईई अॅडव्हान्समध्ये मोठं यश मिळवलं आहे.
JEE Result 2025 :
Success Story Saam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

JEE Result 2025 : देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अॅडव्हान्स्ड 2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये कोटाचा विद्यार्थी रजित गुप्ता याने यावेळी ऑल इंडिया रँक 1 मिळवून संपूर्ण देशात अव्वल स्थान पटकावलंय. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या मुराद अब्बास यांच्या मोहम्मद अय्युब या मुलाने खडतर प्रवासात अभ्यास करत देशात ३२ व रँक मिळवून यश संपादन केलंय. जुन्नर तालुक्यात अय्युब सय्यद हा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. ज्याने जेईई अॅडव्हान्स्ड मध्ये हे यश संपादन केलं. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सय्यद वाडा येथे इलेक्ट्रिशन सोबतच होमगार्ड म्हणून काम करणाऱ्या मुराद अब्बास यांनी आपल्या मुलाला खडतर प्रवासास शिक्षण दिलं. जिद्द,चिकाटी आणि मेहनत केल्याने काहीही शक्य होतं आणि हेच शक्य करण्याचं काम अय्युब सय्यद याने केलं आहे. जेईई अॅडव्हान्स्ड 2025 मध्ये देशात ३२ वा रँक मिळवत त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या जुन्नरच नाव पुन्हा एकदा मोठं केलं आहे.

अय्युब सय्यद हा मूळचा जुन्नर येथील सय्यद वाडा येथे राहत आहे. जुन्नर येथील शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय येथे इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं, त्यानंतर शिवछञपती महाविद्यालय येथे त्याने अकरावी आणि बारावीच शिक्षण घेतलं. दहावी झाल्यावर त्याने जीईइची तयारी सुरू केली. त्याच्या शिक्षणाची आवड पाहता घरची परिस्थिती हलकीची असताना अनेक संस्था संघटनांनी त्याला जेईईसाठी मदत केली. अय्युब याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं आहे.

अय्युब म्हणाला की, लहानपणापासूनच मला शिक्षणाची आवड होती. माझं शिक्षण जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय येथे झालं. दहावी झाल्यावर मला इंजिनीअरिंगसाठी आयआयटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं. त्याची तयारी देखील मी सुरू केली आणि यासाठी जेईई करण्यासाठी मला अनेक लोकांनी मदत केली'.

'वडील होमगार्डसोबत इलेक्ट्रिशनचं काम करत असत. त्यांनी माझ्या शिक्षणाची देखील जबाबदारी घेतली असल्याने मला काहीतरी करायचं आहे. ही बाब मी लक्षात घेतली आणि अभ्यास करू लागलो. आज जे काही मला यश मिळालं आहे. ते माझ्या वडिलांमुळे मिळालं असून याचं श्रेय मी माझ्या घरच्यांना देत आहे. आत्ता माझं एकच स्वप्न आहे की मला मुंबई आयआयटीमध्ये शिक्षण घ्यायच आहे. मला खूप मोठ व्हायचं आहे, असं अय्युब पुढे म्हणाला.

JEE Result 2025 :
Shocking : महाराष्ट्र हादरला! नराधमाने 'खाकी'ची लाज घालवली; पोलीस बापाकडून पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार

वडील काय म्हणाले?

वडील मुराद अब्बास म्हणाले की, आज एवढ्या खडतर प्रवासात माझ्या मुलाने जे काही यश मिळवलं आहे. तो यश त्याचं असून त्याला पुढे जे काही करायचं आहे. त्यासाठी नक्कीच जीवाच रान करेल. त्याला पुढे चांगलं शिक्षण मिळवून देणार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com