HSRP Number Plate: अजूनही एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही; दंड की सवलत मिळणार? वाचा नियम

HSRP Number Plate Penalty: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. त्यानंतरही नंबरप्लेट बसवण्यासाठी दीड महिन्याची मुदत दिली होती. दरम्यान, अजूनही ज्यांनी नंबरप्लेट बसवली नाही त्यांना दंड भरावा लागणार आहे.
HSRP Number Plate
HSRP Number PlateSaam tv
Published On
Summary

एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास काय होणार?

दंड किती भरावा लागणार?

अजूनही एचएसआरपी नंबरप्लेट बसवता येणार का?

राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. जर एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड बसू शकतो. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२६ होती. त्याआधी तुम्हाला हे काम करायचे होते. दरम्यान, असे असले तरीही अजून लाखो वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नाही.

HSRP Number Plate
HSRP Number Plate: लाखो वाहनधारकांनी HSRP नंबरप्लेट बसवलीच नाही, आता फक्त शेवटचे ३ दिवस; मुदतवाढ मिळणार का?

२ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यातील फक्त ५० टक्के वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली आहे. राज्यातील १ कोटी २ लाख वाहनधारकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. त्यातील फक्त ८८ लाख वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवलेली आहे.अजून तेवढ्या वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवणे बाकी आहे. जर नंबरप्लेट बसवली नाही तर दंड भरावा लागणार आहे.

आता परिवहन विभागाने एचएसआरपी नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. फेब्रुवारीपासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुदत संपल्यानंतरही त्यांना दीड महिन्याची मुदत दिली होती. त्यानंतर कारवाईला सुरुवात केली आहे.

HSRP Number Plate
शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

दंड भरावा लागणार (HSRP Number Plate Penalty)

आता एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यावर तुम्हाला १००० ते १०,००० रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे. जर तुम्ही नंबरप्लेटशिवाय वाहन चालवले तर वाहतूक पोलिस कारवाई करतील, तुम्हाला दंड भरावा लागेल.

अजूनही नंबरप्लेट बसवता येणार का? (Can We Still Install HSRP Number Plate)

ज्या वाहनधारकांनी अजूनही नंबरप्लेट बसवलेली नाही ते आताही रजिस्ट्रेशन करु शकतात. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने transport.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही नंबरप्लेट ऑनलाइन ऑर्डर करा. यानंतर वाहनाचा नंबर आणि चेसीस नंबर टाका. यानंतर तुम्हाला पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जवळच्या एजन्सीत अपॉइंटमेंट बुक करायची आहे. यानंतर नंबरप्लेट बसवून घ्या.

HSRP Number Plate
HSRP Number Plate: अजूनही HSRP नंबरप्लेट बसवता येणार का? रजिस्ट्रेशन कसं करायचं? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com