Sakshi Sunil Jadhav
कुत्री हा काहींच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. लोक त्यांना खूप महाग किमतीत विकत घेऊन घरी पाळतात.
तुम्ही सोशल मीडियावर पाहिलच असेल कुत्री अनेकदा अनेकांचे जीव वाचवतात. घरात एक सोबती म्हणून वावरत असतात.
बऱ्याचदा ही आवडणारी कुत्री काहींना इतकं घाबरवतात की, लोक जिथे कुत्री असतील त्या वाटेने जातच नाहीत.
बऱ्याच जणांकडे टू व्हिलर असते आणि त्यांना रात्रीचा प्रवास करावा लागतो. अशावेळेस कुत्री त्यांना प्रचंड घाबरवतात.
टू व्हिलवर असणाऱ्या चालकांवर कुत्री रात्रीच्या वेळी बऱ्याचदा हल्ले करतात. पण असं का? जाणून घेऊयात.
मुळात कुत्र्याला वाहन चालकाशी नाही तर गाडीमधून येणाऱ्या एका उग्र वासाचा त्रास असतो. त्यात कुत्र्यांचं नाक खूप तीक्ष्ण असतं.
जेव्हा एखादी नवी गाडी कुत्र्यांच्या परिसरात येते तेव्हा त्यांच्या गाडीला जर एखाद्या कुत्र्याची घाण लागलेली असेल तर मात्र गडबड होते.
कुत्र्यांना असं वाटतं की, गाडीतून नवीन कुत्री आपल्या परिसरात हल्ला करायला येत आहेत. त्यामुळे कुत्री गाडीच्या मागे भुंकतात.
दुसरं कारण म्हणजे जर एखाद्या गाडीने त्यांच्या पैकी कोणत्या कुत्र्याला जखमी केलं असेल तर ते हल्ला करु शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.