Sakshi Sunil Jadhav
ज्योती वाघमारे या महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्या, प्रखर वक्त्या आणि सध्या शिंदे गटातल्या शिवसेनेतील प्रमुख नेत्या आहेत.
डॉ. ज्योती वाघमारे या फक्त नेत्या नसून सोलापूरमधील आंबेडकरी चळवळीतल्या आक्रमक आणि सक्रिय चेहरा म्हणून ओळखल्या जातात.
राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच या नेत्या उत्तम वक्त्या, निवेदिका आणि सामाजिक विषयांवर भाषण करणाऱ्या अभ्यासू व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत.
ज्योती वाघमारे यांचे शिक्षण हे इंग्रजी विषयात पीएचडी पर्यंत झाले आहे. तसेच पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आल्या होत्या.
अधिव्याख्याता म्हणून दहा वर्षांहून जास्त काळ कामाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. तसेच काही काळ त्या वृत्त निवेदिका म्हणून काम करत होत्या.
ज्योती वाघमारेंचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पॅंथरचे मोठे सक्रिय कार्यकर्ते होते. पोटापाण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेटर, बांधकाम मजूर म्हणून काम केलं.
सुरुवातीला त्या सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय होत्या. मग २०१४ मध्ये महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष झाल्या. पुढे २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यावर शिंदे गटात प्रवेश केला, आता त्यांनी राज्य प्रवक्त्या म्हणून अर्ज दाखल केला आहे.