भाजपच्या बूथ अध्यक्षांचे निधन; पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात शोककळा

BJP Booth President Killed In Chhattisgarh Road Accident: छत्तीसगडमधील अंबिकापूर-रायगड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात भाजपचे बूथ अध्यक्ष शिवमंगल दास यांचा मृत्यू झाला आहे.
BJP Booth President Shivmangal Das dies after a speeding truck hits and drags him on NH-43 in Chhattisgarh.
BJP Booth President Shivmangal Das dies after a speeding truck hits and drags him on NH-43 in Chhattisgarh.saam tv
Published On

छतीसगडमधील अंबिकापुर-रायगड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 43 वर भीषण अपघात झाला आहे. शांतिपारा परिसरात शुक्रवारी रात्री भरधाव ट्रकने दुचाकी चालवत असलेल्या भाजप नेत्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते ट्रकखाली अडकून सुमारे 20 मीटरपर्यंत फरफटत गेले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बतौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

BJP Booth President Shivmangal Das dies after a speeding truck hits and drags him on NH-43 in Chhattisgarh.
Political News: बड्या राजकीय नेत्याच्या मृत्यूनं राजकीय वर्तुळात खळबळ; घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, बतौली तालुक्यातील पोकसरी गावचे रहिवासी आणि भाजपचे बूथ अध्यक्ष शिवमंगल दास (वय 50) हे शुक्रवारी दुपारनंतर काही कामानिमित्त बतौली येथे आले होते. रात्री सुमारे 9.30 वाजता ते दुचाकीने घरी परतत असताना शांतिपारा जवळ अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले असता ट्रकने त्यांना सुमारे 20 मीटरपर्यंत ओढत नेले.

BJP Booth President Shivmangal Das dies after a speeding truck hits and drags him on NH-43 in Chhattisgarh.
कोळशाच्या खाणीत मोठा स्फोट; 90 कामगारांचा होरपळून मृत्यू, जगात खळबळ

रुग्णालयात मृत्यू, चालक फरार

या अपघातात शिवमंगल दास गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, डायल 112 पथकाने त्यांना तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र अंतर्गत गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिकांना ट्रकचा क्रमांक नोंदवता आला नाही. बतौली पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रकचा शोध घेतला जात आहे.

BJP Booth President Shivmangal Das dies after a speeding truck hits and drags him on NH-43 in Chhattisgarh.
Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

शनिवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शिवमंगल दास यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजपचे अनेक नेत्यांना श्रद्धांजली वाहिली असून पक्षात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच अनेक नेत्यांनी त्यांचे नियोजित दौरे रद्द करत दास यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com