Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

karnataka tractor accident on tungabhadra bridge : कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात शुक्रवारी भीषण अपघात झाला. ट्रकच्या धडकेनंतर ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर नऊ जण जखमी झाले आहेत.
ट्रकची जोरदार धडक, ट्रॅक्टर ट्रॉली पुलावरून कोसळली, ६ जणांचा मृत्यू
कोप्पल जिल्ह्यातील भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. saam tv
Published On

ट्रकच्या धडकेनंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर थेट पुलावरून खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात तुंगभद्रा पुलावर घडली. या भीषण अपघातात नऊ जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती पोलिसांनी दिली.

अपघातग्रस्त ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये एकूण १५ प्रवासी होते. ते सर्व जण हुलिगे मंदिराकडे जात होते. कोप्पल जिल्ह्यातील मुनिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुंगभद्रा पुलावर एका ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकची धडक इतकी जोरदार होती की, ट्रॅक्टरच्या चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन तुंगभद्रा पुलाच्या खाली कोसळला.

या भीषण दुर्घटनेत ट्रॉलीतील सहा जणांचा मृत्यू झाला. तर अन्य नऊ जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी ट्रॅक्टरमधून १५ जण प्रवास करत होते. ते हुलिगे मंदिराकडे जात होते. प्राथमिक तपासाच्या आधारे कोप्पलचे पोलीस अधीक्षक राम एल अरसिद्दी यांनी वृत्तसंस्थांना सांगितले की, ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटला आणि तो ट्रॅक्टर पुलाखाली कोसळला.

या अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुनिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुंगभद्रा पूल आहे. पोलिसांनी या अपघाताचा सखोल तपास सुरू केला आहे.

ट्रकची जोरदार धडक, ट्रॅक्टर ट्रॉली पुलावरून कोसळली, ६ जणांचा मृत्यू
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा थरार, ३ मोठे ट्रक उलटले; २ जणांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

बुंदेलखंड महामार्गावर अपघात, ४ ठार

उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात बुंदेलखंड एक्स्प्रेस वेवर गुरुवारी सकाळी कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

देहात पोलीस ठाण्याच्या हद्दीत हथौरा गावाजवळ हा अपघात झाला. भरधाव कार उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. यात कारमधील चौघांचा मृत्यू झाला. त्यात मुलगा, आई, आजी आणि काकीचा समावेश आहे. तर तरुणाची लहान बहीण या अपघातातून बचावली आहे. ती गंभीर जखमी असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ट्रकची जोरदार धडक, ट्रॅक्टर ट्रॉली पुलावरून कोसळली, ६ जणांचा मृत्यू
Best Bus Accident: अंधेरीत चार BEST बसेस एकमेकांवर आदळल्या; जे.पी. रोडवरील विचित्र अपघाताने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com