पहाटे काळाचा घाला! नागपूरमध्ये विटांनी भरलेला ट्रक उलटला, ३ जणांचा मृत्यू, ३ गंभीर जखमी

Nagpur Accident News : नागपूर जिल्ह्यातील ईसापूरजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटल्याने ३ मजुरांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज असून आरोपी चालक फरार झाला आहे.
Nagpur Accident
Nagpur Accident साम टीव्ही मराठी
Published On

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur Accident Death Toll Update : रात्रभर काम करून विटा घेऊन निघालेल्या मजुरांच्या ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. विटांखाली दबून ३ जणांचा मृत्यू झाला, तर ३ जण जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.

नागपूर जिल्ह्यातील ईसापूरजवळ विटांनी भरलेला आयशर ट्रक पहाटे उलटल्याची दुर्दैवी घटना घडली. या भीषण अपघातात ३ मजुरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर तिघांवर जवळच्या सरकारी रूग्णलायात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खापा येथून मोवाडकडे ट्रक जात होता. नसावनेर मार्गावर ईसापूर गावाजवळ पहाटे दुर्दैवी अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला.

Nagpur Accident
Weather Update: चक्रीवादळाचं संकट! १३ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कसं असेल हवामान? पाहा IMD चा अलर्ट

रात्री विटांचा ट्रक भरून घराकडे मजूर निघाले होते. काम केल्यानंतर ट्रकच्या केबिनमध्ये ६ मजूर गाढ झोपेत होते, पण त्याचवेळी काळाने झडप घातली. भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक थेट रस्त्याखाली जाऊन उलटला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. संजय कनेरे, लीलाधर वालूलकर आणि अजित भलावी अशी मृतांची नावे आहेत. राजेंद्र राजगुरू, हेमराज कन्हेरे आणि सुभाष धुर्वे अशी जखमींची नावे आहेत.

Nagpur Accident
विजय यांचं सरकार कोसळणार! तामिळनाडूत कधीही निवडणुका लागू शकतात, माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

भीषण अपघातानंतर चालक-मालक घटनास्थळावरून फरार झाले आहेत. जखमींना वाऱ्यावर सोडून चालकाने पळ काढल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी प्रवीण उर्फ गोलू बले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काटोल पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. बीएनएस आणि मोटार वाहन कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.

Nagpur Accident
बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com