Shocking: आलिशान हॉटेलच्या आडून वेश्याव्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली अन् प्रसिद्ध अभिनेत्रीला रंगेहात पकडलं

Thane Prostitution Racket: ठाण्यामध्ये पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली. वेश्याव्यवसाय करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली. यावेळी दोन मुलींची पोलिसांनी सुटका केली.
Shocking: आलिशान हॉटेलच्या आडून वेश्याव्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली अन् प्रसिद्ध अभिनेत्रीला रंगेहात पकडलं
Thane Prostitution RacketSaam Tv
Published On: 
  • ठाण्यात अभिनेत्रीला वेश्याव्यवसाय प्रकरणी अटक

  • वागळे इस्टेटमध्ये पोलिसांची कारवाई

  • पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकत २ मुलींची सुटका केली

  • भोजपुरी चित्रपटात आणि वेबसीरिजमध्ये तिने काम केले आहे.

ठाण्यामध्ये पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी एका आलिशान हॉटेलवर धाड टाकत अनेकांना नको त्या अवस्थेत पकडलं. या प्रकरण पोलिसांनी भोजपुरी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक केली. मुलींना वेश्या व्यवासायात ढकलल्याचा आरोप या अभिनेत्रीवर आहे. तिला पोलिसांनी रंगेहात पकडलं. पोलिसांनी धाड टाकत दोन मुलींची सुटका केली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने शनिवारी मोठी कारवाई केली. वागळे इस्टेटमधील पडवळनगर परिसरातील एका आलिशान हॉटेलवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली. पोलिसांनी सापळा रचत या प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक केली. तर दोन मुलींची सुटका केली. या दोन्ही मुलींना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

Shocking: आलिशान हॉटेलच्या आडून वेश्याव्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली अन् प्रसिद्ध अभिनेत्रीला रंगेहात पकडलं
Crime: १६ वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, घरच्यांवर नाराज होऊन घराबाहेर पडली अन् भयंकर घडलं

पोलिसांनी संबंधित अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली. तिने आतापर्यंत अनेक मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे. या अभिनेत्रीने अनेक भोजपुरी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. अभिनेत्री असल्याचे सांगत ती या मुलींना काम देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत होती. ती असहाय्य मुलींना वेश्या व्यवसायामध्ये ढकलत होती. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत.

Shocking: आलिशान हॉटेलच्या आडून वेश्याव्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली अन् प्रसिद्ध अभिनेत्रीला रंगेहात पकडलं
Thane Crime: गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर गेला, भांडणानंतर राग डोक्यात गेला; हत्या करून तरुणाने पळ काढला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com