Crime: १६ वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, घरच्यांवर नाराज होऊन घराबाहेर पडली अन् भयंकर घडलं

Delhi Crime: दिल्लीत धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही तरुणी घरच्यांवर नाराज होऊन न सांगता घराबाहेर पडली होती. चुलत बहिणीकडे जात असताना ही घटना घडली.
Crime: १६ वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, घरच्यांवर नाराज होऊन घराबाहेर पडली अन् भयंकर घडलं
Delhi CrimeSaam Tv
Published On
  • दिल्लीत निर्भयासारखी धक्कादायक घटना घडली

  • १६ वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार

  • ड्रायव्हर आणि कंडक्टरने मुलीसोबत केलं भयंकर कृत्य

  • पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली

राजधानी दिल्ली पुन्हा हादरली. दिल्लीमध्ये निर्भयासारखी आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका धावत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. परी चौक ते काश्मिरी गेट या ४७ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान दोन आरोपींनी विद्यार्थिनीवर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या प्रकरणी कारवाई करत दिल्ली पोलिसांनी बसचा ड्रयव्हर आणि कंडक्टरला अटक केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ४ ऑगस्टच्या रात्री काश्मिरी गेट परिसरात घडली.सध्या पोलिसांनी या प्रकरणात बस ड्रायव्हर कुलदीप आणि कंडक्टर संदीप या दोघांना अटक केली. पीडित मुलगी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्याची रहिवासी असून ती इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आहे. पीडित मुलगी कुटुंबीयांवर रागावून घराबाहेर पडली होती. ती नोएडातील तिच्या चुलत बहिणीच्या घरी जात होती. मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ती चुकून ग्रेटर नोएडातील परी चौकात उतरली. त्याचवेळी एक रिकामी स्लीपर बस तिथून गेली. त्या विद्यार्थिनीने बस थांबवण्यासाठी हात दाखवला. त्यानंतर ड्रायव्हरने बस थांबली. बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरने तिला नोएडा सेक्टर ६३ ला बस जात असल्याचे सांगितले.

Crime: १६ वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, घरच्यांवर नाराज होऊन घराबाहेर पडली अन् भयंकर घडलं
Crime: बायकोकडून नवऱ्याची हत्या, चाकूने पोट फाडलं, आतड्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरल्या, नंतर...

बस सुरू झाल्यानंतर कंडक्टरने लगेचच तिच्यासोबत गैरवर्तन करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पीडित मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी तिला रात्री उशिरा काश्मिरी गेट बस स्टँडजवळ रिंग रोडवर बसमधून खाली उतरवले आणि ते तिथून फरार झाले.

Crime: १६ वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, घरच्यांवर नाराज होऊन घराबाहेर पडली अन् भयंकर घडलं
Crime News: आरोपीला घेऊन जाताना पोलिसांवरच हल्ला; गाडी फोडली, हातकडीसह आरोपी फरार!

घाबरलेल्या मुलीने थेट काश्मिरी गेट पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना तिमारपूर येथील बस पार्किंगमधून अटक केली. या घटनेत वापरलेली स्लीपर बस जप्त करण्यात आली असून तिची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे. दिल्लीमधील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Crime: १६ वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, घरच्यांवर नाराज होऊन घराबाहेर पडली अन् भयंकर घडलं
Sangli Crime: भाजप नेत्याला अटक, बँक मॅनेजरच्या घरात केली चोरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com