Sangli Crime: भाजप नेत्याचा कारनामा, बँक मॅनेजरच्या घरावर मारला डल्ला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

BJP Leader Arrested: सांगलीमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्याला पोलिसांनी चोरी प्रकरणात अटक केली. बँक मॅनेजरच्या घरात त्याने चोरी केली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपीपर्यंत पोहचले.
Sangli Crime: भाजप नेत्याचा कारनामा, बँक मॅनेजरच्या घरावर मारला डल्ला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Sangli BJP Leader ArrestedSaam Tv
Published On
  • सांगलीत भाजपच्या स्थानिक नेत्याला अटक

  • भाजपच्या स्थानिक नेत्याने बँक मॅनेजरच्या घरावर डल्ला मारला

  • बँक मॅनेजरच्या घरातून सहा लाखांचा मुद्देमाल केला चोरी

  • माजी सरपंच राहुल पाटीलला चोरीप्रकरणी पोलिसांकडून अटक

  • वैद्यकीय कारणाने त्याला जामीन मिळाला

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्याने बँक मॅनेजरच्या घरी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील अंकली येथे ही घटना घडली. भाजपचे स्थानिक नेते आणि माजी सरपंच राहुल अनिल पाटीलने विश्रामबाग परिसरात राहणाऱ्या एका बँक मॅनेजरच्या घरावर डल्ला मारला. पोलिसांनी या चोरी प्रकरणात राहुल पाटीलला अटक केली. पण काही तासांत त्याला जामीन मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला. कारभारीच चोर निघाल्यामुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्रामबाग येथील एसटी कॉलनीत अश्‍विन शिवकुमार पिल्ले यांचे घर आहे. पिल्ले हे नामांकित बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. १९ ऑगस्ट रोजी ते कुटुंबीयांसोबत बाहेर गेले होते. त्यांच्या बंद घरातून तब्बल सहा लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला. या प्रकरणी त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. या तपासातून पोलिस आरोपीपर्यंत पोहचले खरे पण आरोपी भाजपचा स्थानिक नेता आणि माजी सरपंच असल्याचे कळताच ते देखील चक्रावले. या माजी सरपंचाच्या कारनाम्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

Sangli Crime: भाजप नेत्याचा कारनामा, बँक मॅनेजरच्या घरावर मारला डल्ला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
BJP Reshuffle : अंतर्गत वाद मिटवण्यासाठी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक', एकाच वेळी ३६ जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले, पाहा यादी

एलसीबीच्या पथकानेही तपास सुरू करताच काही सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राहुल पाटीलच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानुसार त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. एलसीबीच्या पथकाने त्याच्याकडून मुद्देमालही वसुल केला. या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली पण काही तासांत त्याला जामीन देण्यात आला. याप्रकरणाची पोलखोल एलसीबीच्या पथकाने केली असून त्यांनी स्वतःच तपास हाती घेतला आहे.

Sangli Crime: भाजप नेत्याचा कारनामा, बँक मॅनेजरच्या घरावर मारला डल्ला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Karnataka Vidhan Sabha Election Results: कर्नाटक निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला नाकारलं; बेळगावात कोणी मारली बाजी?

राहुल पाटीलला अटक करणयात आली पण काही वैद्यकीय कारणाने त्याचा जामीनही झाला. या घटनेला दोन- तीन दिवस झाले, तरी पोलिसांनी कोणतीही माहिती माध्यमांपर्यंत दिली नाही. इतर वेळी चोरीची एक दुचाकी पकडल्यानंतर हातभर प्रेस नोट दिली जाते या गुन्ह्यात गोपनीयता का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राहुल पाटील याचे आणखी काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Sangli Crime: भाजप नेत्याचा कारनामा, बँक मॅनेजरच्या घरावर मारला डल्ला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
BJP MLA: घरात घुसून बॉम्बने उडवून देऊ! भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com